शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

डासमुक्ती संकल्पावर उचलले पाऊल

By admin | Updated: March 12, 2016 01:17 IST

पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या डासमुक्ती संकल्पावर निरगुडसर ग्रामपंचायतीने पहिले पाऊल उचलले आहे. ‘डासमुक्ती नांदेड पॅटर्न’ योजनेचा शुभारंभ येथे शरद बँकेचे संचालक

निरगुडसर : पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या डासमुक्ती संकल्पावर निरगुडसर ग्रामपंचायतीने पहिले पाऊल उचलले आहे. ‘डासमुक्ती नांदेड पॅटर्न’ योजनेचा शुभारंभ येथे शरद बँकेचे संचालक विवेक वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मेंगडेवाडीचे सरपंच भरतफल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे नांदेड पॅटर्न राबविणारे निरगुडसर हे तालुक्यातील व जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरणार आहे. नवीन वर्षात जिल्हा परिषद प्रशासनाने डासमुक्ती संकल्पावर कामकाज सुरू केले आहे. मार्च अखेरपर्यंत डासमुक्ती करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम गावपातळीवर राबविण्याचे ठरविले आहे. या वेळी सरपंच श्रद्धा जाधव, उपसरपंच रामदास वळसे पाटील, विघ्नहरचे संचालक नामदेव थोरात, सुरेश टाव्हरे, बाळासाहेब मेंगडे, आनंदराव वळसे, माऊली टाव्हरे, सुरेश आवारी, ग्रामविस्तार अधिकारी ए. एस. कांबळे उपस्थित होते. तसेच मेंगडेवाडी, जवळे, भराडी, पारगाव, खडकी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.>> साधारणपणे खेडेगावात ताप या आजाराला लोक बळी पडत आहेत. मलेरिया, डेंगी, चिकुनगुण्या, हिवताप आदी आजारांचे प्रमाण वाढले आहे. हे आजार डास किंवा माशा खाद्यपदार्थांवर बसल्याने किंवा डंखकेल्याने होतात. मग डास किंवा माशा हद्दपार केले, तर आजारापासून मुक्तता मिळेल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी ही योजना प्रभावीपणे राबवावी. - स्मिता पाटील, गटविकास अधिकारी आंबेगाव