शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत राहताय... रेशनकार्ड मिळेल

By admin | Updated: February 21, 2015 01:50 IST

परदेशात जन्म झालेल्या व्यक्तीला रेशनकार्डसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ते विभागीय आयुक्त कार्यालय आणि गृह विभागाची परवानगी लागते.

पुणे : परदेशात जन्म झालेल्या व्यक्तीला रेशनकार्डसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ते विभागीय आयुक्त कार्यालय आणि गृह विभागाची परवानगी लागते. मात्र, तुमचा जन्म दुबईत झाला असला तरी अडचण नाही, फक्त काही कागदपत्रे द्या, रेशनकार्ड देतो, असे पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका नायब तहसीलदारालाच एजंटने सांगितले. शिवाजीनगर गोदामात असलेल्या नागरी सुविधा केंद्राला पडलेला एजंटांचा विळखा ‘लोकमत’ने शुक्रवारी ‘स्टिंग आॅपरेशन’द्वारे उघडकीस आणला. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने एका नायब तहसीलदार दर्जाच्या महिला अधिकाऱ्यास पाहणी करण्यासाठी पाठविले. त्यांनी नागरी सुविधा केंद्राच्या आवारात प्रवेश केला. वेळ संपली असल्याने कार्यालय बंद होते. त्यामुळे चौकशी करत असताना एका एजंटने बरोबर हेरले. स्वत:हून चौकशी सुरू केली. या नायब तहसीलदार यांनी सांगितले, की माझा जन्म दुबईचा आहे, काही अडचण येईल काय? यावर एजंटकडून काही अडचण येणार नाही, असा विश्वास देण्यात आला. फक्त तुमच्या वडिलांचे लाईट बिल आणि तुमचा पासपोर्ट लागेल असे सांगण्यात आले. यावरदेखील तत्काळ दाखला पाहिजे असल्याने नक्की काही अडचण येणार नाही ना? असे विचारल्यावर, कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगितले. सोमवारी तुमचे काम होईल, असेही सांगण्यात आले. हा सर्व प्रकार पाहून या नायब तहसीलदार चक्रावून गेल्या. त्यांनी तहसीलदार मोहिनी चव्हाण यांना याबाबतची सर्व माहिती दिली. त्यांनाही हा सर्व प्रकार पाहून धक्का बसला. याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ४कार्यालयाची वेळ संपल्यानंतरही एजंट नागरिकांकडून घेत होते कागदपत्रे.४तत्काळसाठीही कोणती अडचण येणार नसल्याचा देतात विश्वास.४कारवाईचे अधिकाऱ्यांचे आश्वासन.शिवाजीनगर येथील नागरी सुविधा केंद्रात नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकारी महिलेलाच रेशनकार्ड काढण्याच्या प्रक्रियेची माहिती देताना एजंट.