शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

लखलखला शिवाजी महाराजांचा पुतळा

By admin | Updated: November 15, 2015 01:07 IST

शिवछत्रपतींचा जगातील पहिला भव्य अश्वारूढ पुतळा असणाऱ्या एसएसपीएमएम शाळेचा परिसर तुतारीच्या ललकारीत आणि सनई-चौघड्यांच्या मंगल निनादात प्रकाशाने उजळून निघाला

पुणे : शिवछत्रपतींचा जगातील पहिला भव्य अश्वारूढ पुतळा असणाऱ्या एसएसपीएमएम शाळेचा परिसर तुतारीच्या ललकारीत आणि सनई-चौघड्यांच्या मंगल निनादात प्रकाशाने उजळून निघाला. असंख्य पुणेकरांनी या पुतळ्याच्या वजनाइतक्याच ८ हजार पणत्या प्रज्वलित केल्या. शिवजयंती महोत्सव समितीतर्फे या उपक्रमाच्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. दीपोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट, बाळासाहेब लांडगे, नगरसेवक बाळासाहेब बोडके, अ‍ॅड. प्रताप परदेशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, प्रवीण परदेशी, शिल्पकार विवेक खटावकर, वामनतात्या जगताप, समितीचे संस्थापक-अध्यक्ष अमित गायकवाड व उपस्थित स्वराज्य घराण्यांच्या हस्ते झाले. अखंड भारताच्या स्वभिमानाचे प्रतीक असणारा शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन बापट यांचा सत्कार करण्यात आला. समितीतर्फे शिवजयंतीला आयोजिण्यात येणाऱ्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी झालेल्या पासलकर, जेधे, बांदल, कंक, मालुसरे, पायगुडे, कोंढे, ढमढेरे, सणस, शिळीमकर, करंजावणे, निंवगुणे, कडू, धुमाळ, काकडे, मोहिते, घोरपडे, जगताप, थोपटे, मरळ, शितोळे, भुरुक, पवार, गायकवाड, शिंदे या स्वराज्य घराण्यांचा सत्कार करण्यात आला. दीपोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गेले ४ पर्व काम करणाऱ्या नीलेश जगताप, शिवाजी तावडे, युवराज शिंदे, सुशांत साबळे, कृष्णसुंदर गार्डनचे कर्मचारी यांनाही गौरविण्यात आले. समितीच्या गिरीश गायकवाड, दीपक घुले, रणजित शिंदे, महेश मालुसरे, सचिन पायगुडे, नीलेश जेधे, शंकर कडू, गोपी पवार, दत्ताभाऊ पासलकर, किरण देसाई, किरण कंक, मयूरेश दळवी, प्रशांत साळुंखे, धीरज थोपटे, बाळासाहेब माने, रवींद्र कंक, रोहित घोरपडे, प्रशांत धुमाळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले.