शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पानिपत येथे होणार प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:11 IST

सोमवार, दि. २० सप्टेंबर, २०२१ हा दिवस समस्त भोरवासीयांनी इतिहासात नोंद करून ठेवला. निमित्त होते हरियाणा पानिपतस्थित आपल्या रोड ...

सोमवार, दि. २० सप्टेंबर, २०२१ हा दिवस समस्त भोरवासीयांनी इतिहासात नोंद करून ठेवला. निमित्त होते हरियाणा पानिपतस्थित आपल्या रोड मराठा समाजाविषयीची नाळ घट्ट करण्याचे. त्यांचे महाराज आणि समस्त मराठा समाजाप्रती असलेले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा पाहून भोरमधील समस्त शिवप्रेमींनी एक अनोखा उपक्रम करण्याचे ठरविले. आपलं नात पिढ्यानपिढ्या असंच राहावं, या उद्देशाने हरियाणा, पानिपत येथील रोड मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावरील मूर्ती शिल्पकार दीपक थोपटे यांच्याकडून बनवून घेतली. याकामी भोरमधील मराठ्यांसह इतर समाजातील अनेक दानशूर व्यक्ती पुढे आल्या. सोबत शिवकार्यासाठी तळमळीने अविरत कार्य करणारे शेकडो शिवभक्त या सर्वांच्या मदतीने मूर्ती बनवली आहे.

शिवस्वराज्य भूमी भोर मावळ प्रांत छत्रपतींनी ज्या रायरेश्वरावर शंभू महादेव आणि याच भागातील मावळ्यांच्या साक्षीनं स्वराज्यचं स्वप्न बघितलं आणि ते सत्यात उतरवलं. आज ३५०पेक्षा जास्त वर्षे होऊनही आज आपल्या सर्वांच्या मनात महाराजांचं अस्तित्व अबाधित आहे. राजगड, तोरणा, रोहिडेश्वर, केंजळगड त्याबरोबरच अनेक मावळे याच भोर वेल्ह्याच्या मातीतून, याच प्रांतातून ज्या ठिकाणी मराठ्यांचं रक्त सांडलं, जिथं लढाई हरूनसुद्धा मराठ्यांचा उद्धार आजही जगात अभिमानाने होत आहे, अशा पानिपत (हरियाणा)मध्ये अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसवण्यात येणार आहे. महाराजांच्या मूर्तीचे शहरात स्वागत करुन मूर्ती पानिपतकडे रवाना झाली. २६ सप्टेंबरला भोर तालुक्यातील अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीत पानिपत येथे मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.