शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्टेशनरीअभावी मिळेना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र; महापालिकेचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 03:53 IST

केवळ स्टेशनरीची खरेदी न केल्याने अनेक दिवसांपासून पुणेकरांना पैसे देऊनदेखील जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रती मिळत नाहीत.

पुणे : शहरामध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या प्रती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, केवळ स्टेशनरीची खरेदी न केल्याने अनेक दिवसांपासून पुणेकरांना पैसे देऊनदेखील जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रती मिळत नाहीत. महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा सर्वसामान्य पुणेकारांचा चांगलाच फटका बसत आहे.महापालिकेच्या वतीने प्रत्येक एक प्रत मोफत दिली जाते. तर, नागरिकांना अधिकच्या प्रती आवश्यक असल्यास प्रतिप्रत १० रुपये फी घेऊन हे प्रमाणपत्र देण्यात येत होती. अनेक वर्षांपासून १० रुपये प्रत्येकी या किमतीला कितीही प्रती मिळण्याची व्यवस्था महापालिकेत आहे. नागरिकांना प्रामुख्याने मृत्यू दाखल्याची गरज जास्त पडत असल्याने बहुसंख्य नागरिक १० ते १५ प्रती घेतात. यामधून महापालिकेला अल्प का होईना उत्पन्नही मिळते व नागरिकांची सोयदेखील होते. मात्र, काही आठवड्यांपासून या प्रमाणपत्रांच्या स्टेशनरीचे शॉर्टेज झाल्याने व ती वेळेत खरेदी न केल्याने सगळ्या नागरिकांना दोनच प्रती मिळत आहेत. स्टेशनरी कमी पडत असल्याने केवळ जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या केवळ दोनच प्रती देण्यात याव्यात, असा अजब फतवा आरोग्य विभागाने काढला आहे. यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये पुरेशी तरतूद असूनदेखील केवळ प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे वेळेत टेंडर करण्यात आलेले नाही. यामुळे नागरिकांची मात्र प्रचंड अडचण झाली आहे. दरम्यान, या प्रमाणपत्रांच्या नमुन्याची छपाई करण्याचे टेंडर करण्यास उशीर झाल्याने पंधरा-वीस दिवसांपासून नागरिकांना कमी प्रती मिळत आहेत; परंतु आता दोन दिवसांत टेंडरची प्रक्रिया पूर्ण होऊन, लवकरच जन्मदाखल्याच्या प्रत्येकी १० व मृत्यू प्रमाणपत्राच्या आवश्यक तेवढ्या प्रती उपलब्ध करून देण्यात येतील, असे आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.अधिकाऱ्याची चौकशी कराशहरातील नागरिकांसाठी जन्म-मृत्यू प्रमाणपत्राची सुविधा अत्यंत आवश्यक आहे. यासाठी दर वर्षी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये पुरेशी तरतूद करण्यात येते. परंतु, संबंधित अधिकाºयांनी केवळ वेळेत टेंडर न लावल्याने अनेक दिवसांपासून नागरिकांना पैसे देऊनदेखील अधिकच्या प्रती मिळत नाहीत. याबाबत टेंडर प्रक्रियेला उशीर करणाºया अधिकाºयाची चौकशी करून त्वरित कारवाई करावी, तसेच नागरिकांना तातडीने अधिकच्या प्रती उपलब्ध करून देण्याची सुविधा द्यावी.-विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका