शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘केंद्र’ विरोधी गुरुवारच्या देशव्यापी संपात राज्यातील महसूल कर्मचारी सहभागी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 20:39 IST

महसुल कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे एमआयडीसी पाठोपाठ महसुल कामकाज देखील गुरुवारी ठप्प होणार आहे.

 बारामती : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात गुरुवारी (दि. २६ ) पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात राज्यातील महसूल कर्मचारीही सहभागी होणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी माहिती दिली.

महसुल कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे एमआयडीसी पाठोपाठ महसुल कामकाज देखील गुरुवारी ठप्प होणार आहे. राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत, यामध्ये १९८२ ची जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरु करावी,व अंशदायी पेन्शन योजना बंद करावी,  केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता, शहर भत्ता, अतिकालिक भत्ता व इतर सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावेत, ६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ,शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन समितीच्या त्रुटी दूर कराव्यात, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे धोरण रद्द करावे, सर्व संवगार्तील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवाव्या,आदी मागण्यांचा यामध्ये समावेश असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 या मागण्यांसाठी राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहभागी होणार आहेत.राज्य सरकारी संघटनेने दिलेल्या निर्देशानुसार महसूल विभागातील पदोन्नती नायब तहसिलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, वाहन चालक, शिपाई, कोतवाल आदी कर्मचारी या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत.  याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना देण्यात आले. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष  चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली, जिल्हा उपाध्यक्ष सचिन तारु, जिल्हा सरचिटणीस सचिन तांबोळी आदी उपस्थित होते. ———————————————————————— 

टॅग्स :BaramatiबारामतीCentral Governmentकेंद्र सरकारStrikeसंप