शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जानकरांचे ‘ते’ वक्तव्य असभ्यपणाचा कळस

By admin | Updated: October 13, 2016 02:16 IST

विजयादशमीच्या पवित्र सणाच्या दिवशी शुभेच्छा देण्याऐवजी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत ओकलेली गरळ हे असभ्यपणाचे लक्षण

शिरूर : विजयादशमीच्या पवित्र सणाच्या दिवशी शुभेच्छा देण्याऐवजी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत ओकलेली गरळ हे असभ्यपणाचे लक्षण असल्याची टीका माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी येथे केली. दुसऱ्यांवर गरळ ओकण्यापेक्षा महाजन यांनी धनगर आरक्षणाबाबत काय झाले, याचे उत्तर द्यावे, असेही पवार म्हणाले.विजयादशमीनिमित्त भगवानगडाच्या पायथ्याला पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित मेळाव्यात जानकर यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर शिवराळ भोषत टीका केली होती. त्याच्या निषेधार्थ आज शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर शिवसेवा मंडळासमोर जानकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. निषेध सभा घेण्यात आली, त्या वेळी अ‍ॅड. पवार बोलत होते. मंत्रिपद मिळत नव्हते तोपर्यंत पवारांची स्तुती व मुख्यमंत्र्यावर टीका करणारे जानकर मंत्रिपद मिळाल्यावर पवारांवर टीका करून दुतोंडी राजकारण करीत असल्याची टीका अ‍ॅड. पवार यांनी केली. जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवी काळे यांनीही जानकर यांच्यावर जोरदार टीका केली.जि.प. सदस्या मनीषा कोरेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जाकीरखान पठाण, माजी अध्यक्ष संतोष भंडारी, युवकचे तालुकाध्यक्ष कुंडलिक शितोळे, घोडगंगाचे संचालक अ‍ॅड. रंगनाथ थोरात, बाबासाहेब फराटे, दिलीप मोकाशी, युवकचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, नगरसेवक आबिद शेख, शिक्षण मंडळ सदस्य नीलेश खाबिया, संतोष शितोळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दिनकर पाडळे, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, माजी अध्यक्ष नीलेश पवार, सागर पांढरकामे, हाफीज बागवान, मोनीब शेख, युवती तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे आदींसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)