शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

By admin | Updated: October 26, 2016 05:57 IST

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून (दि. २६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव

पुणे : विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून (दि. २६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असून, राजेंद्र मुठे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.अद्याप एकाही पक्षाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. कॉँग्रेस-राष्ट्रवादी किंवा शिवसेना-भाजपा युती होणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे सध्या या चारही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये विधान परिषदेसाठी नवीन चेहरा देण्याची जोरदार मागणी होत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून विद्यमान आमदार अनिल भोसले, जालिंदर कामठे, प्रदीप कंद, प्रकाश म्हस्के, आझम पानसरे, विलास लांडे, महापौर प्रशांत जगताप, अप्पा रेणुसे इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अरविंद शिंदे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. भाजपामध्ये बापू भेगडे आणि गणेश बिडकर, अशोक येनपुरे हे इच्छुक आहेत. (प्रतिनिधी)- आमदार अनिल भोसले यांचा सहा वर्षांचा कार्यकाल ५ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांतील नगरसेवक मतदार आहेत. २६ ते २ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, ३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी, ५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. १९ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान झाल्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.