शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त भागामध्ये तत्काळ टॅँकर सुरू करा

By admin | Updated: April 9, 2017 04:27 IST

जिल्ह्यातील टँकर सुरू करण्याची शासकीय प्रकिया बंद करावी, मागणी करताच टँकर सुरू करावा, टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत अशी मागणी जिल्हा परिषद

पुणे : जिल्ह्यातील टँकर सुरू करण्याची शासकीय प्रकिया बंद करावी, मागणी करताच टँकर सुरू करावा, टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी पाणीटंचाई आढावा बैठकीत केली. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी पाणीटंचाई आढावा बैठक बोलावली होते. उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, समाजकल्याण समिती सभापती सुरैखा चौरे आणि जिल्हा परिषद व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.टंचाईग्रस्त भागातील ग्रामस्थांनी ग्रामसेवकांकडे टँकरची मागणी केल्यानंतर शासकीय प्रकिया पार पडून १५ दिवसांनी पाणीपुरवठा सुरू होतो. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. टंचाईग्रस्त गावामध्ये हातपंपाची दुरुस्ती प्राधान्याने करावी, नव्याने विंधन विहिरी बांधाव्यात, पाणीपुरवठा योजना दुरुस्त कराव्यात, शिवकालीन खडकातील टाक्या बांधाव्यात अशा सूचना केल्या. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या सूचनांनुसार उपाययोजना केल्या जातील. तहसीलदारांना टँकरचे अधिकार द्यावेत, मागणी केल्यानंतर तत्काळ टँकर द्यावा या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी सदस्यांच्या मागणीनुसार पूरक टंचाई आराखड्यात उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.टँकर कोणासाठी ? : हव्या ठोस उपाययोजनापाणीटंचाईग्रस्त भागामध्ये टँकर माणसे जगवण्यासाठी आहेत की कार्यकर्त्यांसाठी? टँकरमुक्तीसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. टँकरमुक्त गाव आणि जिल्हा झाला पाहिजे. वषार्नुवर्षे काही ठराविक गावांमध्ये टँकर सुरू असतात. या गावांमधील टँकरमुक्तीसाठी ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीच? टँकर हा कार्यकर्त्यांना जगवण्यासाठी आहे का, असा सवाल काँग्रसेच्या गटनेते विठ्ठल आव्हाळे यांनी सभागृहात केला. टँकरमध्ये भष्ट्राचार होत असल्याचाही आक्षेप त्यांनी घेतला. वरिष्ठ अधिकारी नसल्याने गोंधळ जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेत आढावा बैठक बोलावण्यात आली होती. पाणीटंचाई आराखडा आणि जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर बैठकीत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते; परंतु या बैठकीला इरिगेशन, वीजवितरण, रोजगार हमी, तसेच संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कोण देणार, म्हणत सदस्यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना धारेवर धरले. पहिल्याच बैठकीला ही परिस्थिती असल्याने नाराजी होती. या वेळी शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके आणि भाजपाचे गटनेते शरद बुट्टे यांनी या घटनेचा निषेध नोंदविला पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर अधिकारी वर्ग गैरहजर राहत असतील, तर अधिकाऱ्यांना पाणीटंचाईचे गांभीर्य नाही का, असा प्रश्न उपस्थित केला.