शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

टँकर, चारा छावण्या सुरू करा

By admin | Updated: April 25, 2017 03:48 IST

इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी मिळावे, ३५ गावांना पाण्याचे टँकर सुरू व्हावेत, जनावरांसाठी चारा आणि चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत

इंदापूर : इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी मिळावे, ३५ गावांना पाण्याचे टँकर सुरू व्हावेत, जनावरांसाठी चारा आणि चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत आदी महत्त्वाच्या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. २ मे) तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा महामोर्चा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.पाटील म्हणाले, की भाटघर, खडकवासला या धरणांतील इंदापूरकरांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळालेच पाहिजे. नीरा डावा कालव्याचे आवर्तन मिळाले पाहिजे. या वर्षी उजनी धरण ११० टक्के भरलेले असताना अमाप पाणी सोडण्यात आल्याने सध्या धरणाची पातळी शून्यावर आली आहे. तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना उचल पाण्याचा हक्क अबाधित राहिला पाहिजे. तालुक्यातील ३५ टंचाईग्रस्त गावांत टँकर सुरू झाला पाहिजे. जनावरांसाठी पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत, अशा येथील शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. भाटघर व खडकवासला धरणांतून इंदापूर तालुक्यासाठी मिळणारे हक्काचे पाणी दुसऱ्या बारामती व दौंड तालुक्यांनी पळविले. त्यामुळे तिकडे हिरवळ, तर इकडे वाळवंट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला, भाटघर व नीरा डावा कालव्याचे आवर्तन मिळणे गरजेचे होते. खडकवासला व भाटघर धरणे पावसाळ्यात दोन वेळा भरली. उजनी ११० टक्के भरले होते. सध्या भाटघर धरण ४५ टक्के व खडकवासला धरण ३५ टक्के पाणीसाठा आहे. उजनी धरण मात्र झपाट्याने कोरडे होत आहे.कालवा सल्लागार समितीमध्ये प्रत्येक तालुक्याचा लोकप्रतिनिधी असतो. त्याने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. दौंड तालुक्यातील तलाव भरले आहेत. इंदापूर तालुक्यातील स्थिती विदारक आहे. तालुक्यातील तरंगवाडी तलावापासून मदनवाडी तलावापर्यंत २२ तलावांत पाणी सोडले गेले नाही. तरंगवाडी तलाव हा इंदापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केला आहे. या तलावावरून गोखळी, गलांडवाडी, तरंगवाडी, झगडेवाडी आदी गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना आहेत. अशी वस्तुस्थिती असताना अद्याप तलावात पाणी सोडण्यात आलेले नाही. उलट, इंदापूर नगर परिषदेला तरंगवाडी तलावातील पाण्याची गरज नसल्याचे पत्र पाटबंधारे विभागाने मागितले आहे. सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.