शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

निधीसाठी तारेवरची कसरत

By admin | Updated: November 28, 2014 23:17 IST

बेळगावमध्ये 95 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाची एकीकडे जय्यत तयारी सुरू झाली आहे. बेळगावचे दर्शन घडविणारे बोधचिन्हही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पुणो :  बेळगावमध्ये 95 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाची एकीकडे जय्यत तयारी सुरू झाली आहे. बेळगावचे दर्शन घडविणारे बोधचिन्हही प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र,  संमेलनासाठी निधी कुठून, आणि कसा उभा करायचा? हे आयोजकांना पडलेले कोडे मात्र अद्याप सुटलेले नाही. 
संमेलनाच्या निधीसाठी गोव्याच्या कोळसा खाण उद्योगांवर भिस्त ठेवण्यात आली होती. मात्र, खाणीच बंद झाल्यामुळे पैसा कुठून आणायचा,  या चिंतेने आयोजकांना ग्रासले आहे. आता मराठी अस्मितेच्या मुद्यावर मतप्रदर्शन करणा:या महाराष्ट्रातील राजकारण्यांनीच संमेलनासाठी आर्थिक सहकार्य करावे, अशी आर्त साद बेळगाव नाटय़ परिषदेने घातली आहे. 
अनेक वर्षानी  बेळगावात नाटय़ संमेलनाची  घंटा  वाजणार आहे. त्यामुळे तेथील मराठी भाषिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विविध उपक्रमांच्या आयोजनांच्या माध्यमातून संमेलनाची वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न बेळगाव नाटय़ परिषदेकडून  करण्यात येत आहे. संमेलनासाठी मोठय़ा संख्येने नाटय़प्रेमी आणि रंगकर्मी बेळगावात येणार आहेत. त्यांची निवास, खानपान सेवा यांसह संमेलनासाठीचा एकूण खर्च हा 2 कोटी रुपयांच्या घरात 
जाणार असल्याचा अंदाज आयोजकांकडून बांधण्यात आला आहे. मात्र, एवढा निधी उभा करणो ही आयोजकांसाठी अशक्यप्राय गोष्ट ठरत आहे.  (प्रतिनिधी)
 
1  ज्या ज्या ठिकाणी निधीसाठी आयोजक जात आहेत, त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. बेळगावात फाउंड्रीचा मोठा उद्योग आहे. गोव्याच्या खाण उद्योगावरही आयोजकांची भिस्त होती. मात्र, या खाणीही बंद झाल्यामुळे निधीसाठी हात तरी कोणाकडे पसरायचे, अशी अवस्था आयोजकांची झाली आहे. 
 
2 कर्नाटक-सीमा प्रश्नाचे घोंगडे अनेक वर्षापासून भिजत पडले आहे. येळ्ळूरमध्ये मराठी भाषिकांवर झालेला अत्याचार आणि बेळगावचे  ‘वेळगावी’ झालेले नामकरण या पाश्र्वभूमीवर हे संमेलन बेळगावमध्ये होत आहे. मराठी अस्मितेचा जाज्वल्य इतिहास सांगणा:या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी तरी संमेलन निधीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
‘बोधचिन्हा’तून बेळगाव दर्शन
4बेळगाव नाटय़ परिषदेकडून नाटय़ संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध करण्यात आले. बेळगाव हे  ‘वेणूग्राम’ म्हणजे बांबूंचे गाव म्हणून ओळ्खले जात होते. म्हणून बांबूचा वापर यात करण्यात आला आहे. बेळगावचा कशिदा प्रसिद्ध असल्याने, त्याला कशिद्याची बॉर्डर ठेवली आहे, तर सार्वजनिक वाचनालयाचे ऐतिहासिक घडय़ाळ (टॉवर) याचाही समावेश करण्यात आला आहे. 
4बोधचिन्ह तयार करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती, त्यातून 16 बोधचिन्हांची निवड करण्यात आली. मात्र, नाटय़ संमेलनाला सयुक्तिक असलेले एकही बोधचिन्ह नसल्याने परिषदेनेच ऑरेंज डिझायनिंग स्टुडिओच्या संदेश कुंभारकर यांच्याकडून हे बोधचिन्ह तयार करून घेतले.  
 
नाटय़ संमेलनासाठी प्रत्येक मराठी माणसाने आणि कलेच्या उपासकाने हे संमेलन आपले आहे, असे समजून जर व्यक्तीमागे शंभर रुपये दिले, तरीही लोकनिधीतून हे संमेलन होऊ शकणार आहे. असे झाले, तर कोणापुढेही हात पसरण्याची गरज भासणार नाही.
- वीणा लोकूर, 
अध्यक्ष, बेळगाव नाटय़ परिषद.