शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारामार्फत वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 03:31 IST

महापालिकेच्या इमारतींवर ठेकेदाराच्या माध्यमातून सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करण्याचा महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी ठेवलेला प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी

पुणे : महापालिकेच्या इमारतींवर ठेकेदाराच्या माध्यमातून सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करण्याचा महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी ठेवलेला प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी बहुमताने फेटाळून लावला. फेरटेंडर प्रक्रिया राबवून महापालिकेमार्फत हा वीजनिर्मिती प्रकल्प राबविण्यात यावा, अशी उपसूचना या वेळी मंजूर करण्यात आली.सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत भारतीय सौरऊर्जा निगम यांनी निवड केलेल्या दोन कंपन्यांमार्फत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी मांडला होता. याअंतर्गत या कंपन्यांना महापालिकेच्या इमारतींवरील टेरेसची जागा उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांना देखभाल खर्च देण्याचे प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले होते. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला आला असता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे व शिवसेनेच्या सदस्यांनी याला विरोध केला. त्यामुळे हा प्रस्ताव मतदानाला टाकण्यात आला. त्या वेळी भाजप वगळता सर्व पक्षांनी विरोधात मतदान केले. महापालिकेनेच हा प्रकल्प राबवावा, अशी उपसूचना मंजूर करून स्थायी समितीने आयुक्तांचा प्रस्ताव ९ विरुद्ध ३ मतांनी फेटाळून लावला, अशी माहिती समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी दिली.सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती व देखभालीसाठी ५ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे ठेकेदारामार्फत हा प्रकल्प न उभारता महापालिकेनेच हा प्रकल्प राबवावा, अशी सूचना स्थायी समितीच्या सदस्यांनी केली. केंद्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कुणाल कुमार यांनी महापालिकेच्या १९ इमारतींवर सौरऊर्जेपासून १ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव ठेवला. अशा पद्धतीने वीजनिर्मिती करणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे असे त्यांनी ट्विट केले होते. सौरऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी ५ रुपये ६० पैसे प्रतियुनिट खर्च येणार आहे. महावितरणकडून प्रतियुनिट १० रुपये ३० पैसे दराने वीज महापालिकेला घ्यावी लागते. यामुळे पालिकेची वर्षाला ६० लाख रुपयांची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ठेकेदाराला ३० वर्षे कराराने जागा देण्यात येणार होती.