शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

स्थायी समिती सभेत ऐनवेळच्या विषयाचा धडाका

By admin | Updated: October 6, 2016 02:53 IST

मासूळकर कॉलनी येथील आरक्षण क्र. ८५ येथे नागरी आरोग्य केंद्र रुग्णालय व निवासी डॉक्टरांचे वसतिगृह बांधण्यासाठी येणाऱ्या सुमारे २४ कोटी ९० लाख ४९ हजार रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकासविषयक कामे

पिंपरी : मासूळकर कॉलनी येथील आरक्षण क्र. ८५ येथे नागरी आरोग्य केंद्र रुग्णालय व निवासी डॉक्टरांचे वसतिगृह बांधण्यासाठी येणाऱ्या सुमारे २४ कोटी ९० लाख ४९ हजार रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३४ कोटी ५४ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐन वेळच्या ५५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी डब्बू आसवानी होते.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांना खूश करण्याचे धोरण सत्ताधारी राष्ट्रवादीने आखले आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दीड वर्षे पूर्ण झालेल्या बचत गटाला २० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येते. शहरात २००१पासून महिला बचत गट सुरू झाले आहेत. नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत सन २००१-०२ ते सन २०१५-१६ या १५ वर्षामध्ये एकूण ३ हजार ६१३ बचत गटांना एकूण ६ कोटी ५८ लाख ८० हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. प्रभाग क्र. ३४ गव्हाणे वस्तीमध्ये आरक्षण क्र. ४१४ येथे बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलच्या वरच्या मजल्यावर फर्निचर व्यवस्था करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३१ लाख ३२ हजार रुपयांच्या खर्चास, चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र.२६, २७ मधील काळभोरनगर, मोरवाडी परिसरातील जुन्या व खराब झालेल्या जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या सुमारे २६ लाख ४५ हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. ड प्रभागांतर्गत वाकड येथील रस्त्यावरील विद्युतविषयक कामासाठीच्या ३४ लाख ९९ हजार रुपयांच्या खर्चास, चिखली गावठाण व परिसरातील जलवाहिनीसाठी येणाऱ्या सुमारे ३७ लाखांच्या खर्चास मान्यता दिली.प्रभाग क्र. ५३ मधील वाकड फ्लायओव्हरपासून प्रोलाइनपर्यंत २४ मीटर डीपी रस्त्याचे डांबरीकरण करणेकामी एक कोटी ३० लाख ३७ हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. ३९ संत तुकारामनगरमधील ययाती व अक्षय सोसायटी परिसरात नवीन पेव्हिंग ब्लॉक व इतर कामांसाठी येणाऱ्या ३३ लाख ८६ हजारांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.प्रभाग ३९ संत तुकाराम नगरमधील एकता मित्र मंडळ परिसरात स्टॉर्म वॉटर लाइन टाकण्यासाठी व कॉँक्रिट करण्यासाठी येणाऱ्या सुमारे २९ लाख ७१ हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. ५३ मधील कस्तुरी हॉटेलपासून व विनोदे वस्तीमार्गे अक्षरा स्कूलकडे जाणारा २४ मीटर डी.पी रस्ता विकसित करण्यासाठी २ कोटी ६२ लाख रुपयांच्या खर्चास, प्रभाग २२ चिंचवड गावातील थेरगाव पूल ते मोरया गोसावी मंदिर परिसर रस्ता विकसित करण्यासाठी ९९ लाख रुपयांच्या खर्चास, थेरगाव गावठाण २४ मीटर डी.पी. रस्त्याचे डांबरीकरणासाठी ५९ लाख ४८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)४ सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी बचत गट अनुदानासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, महापालिका हद्दीतील दीड वर्षे पूर्ण झालेल्या ८४ महिला बचत गटांनी अर्ज सादर केले. या अर्जांची तपासणी केली असता, केवळ आठ अर्ज पात्र ठरले. या आठ बचत गटांना प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख ६० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात दीड वर्ष पूर्ण झालेल्या बचत गटांना अर्थसाहाय्य देण्यासाठी ४० लाख रुपयांची तरतूद शिल्लक आहे. त्यामधून दीड लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.