शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती ठेकेदारावर उदार

By admin | Updated: May 9, 2014 09:13 IST

पावसाळापूर्व कामांसाठी एका ठेकेदाराची १२ टक्के कमी दराने ८ कोटी ७६ लाख रुपयांची निविदा स्थायी समितीपुढे आली होती. मात्र, अर्थिक तोटा असतानाही महापालिकेचे स्थायी समिती सदस्य उदार झाले.

- ठेकेदारावर सव्वा कोटींची मेहेरबाणी; प्रस्ताव ठरणार वादग्रस्त पुणे : पावसाळापूर्व कामांसाठी एका ठेकेदाराची १२ टक्के कमी दराने ८ कोटी ७६ लाख रुपयांची निविदा स्थायी समितीपुढे आली होती. मात्र, अर्थिक तोटा असतानाही महापालिकेचे स्थायी समिती सदस्य उदार झाले. त्यामुळे ठेकेदाराला निविदा रकमेऐवजी महापालिकेच्या पूर्वगणनपत्रकानुसार १० कोटीचा म्हणजे वाढीव सव्वा कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे. गतवर्षांप्रमाणे कसबा-विश्रामबागवाडा, सहकारनगर, धनकवडी, टिळक रस्ता व बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत पावसाळापूर्व कामे करण्याच्या सूचना आयुक्त विकास देशमुख यांनी दिली. त्यानुसार पावसाळापूर्व रस्त्यांचे डांबरीकरण आणि पावसाळ्याच्या काळात खड्डे बुजविणे व रस्त्याची डागडुगी करण्यासाठी ९ कोटी ९९ लाख ८९ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक प्रशासनाने तयार केले. त्यानुसार चार ठेकेदारांनी निविदा भरली. त्यापैकी केवळ दोन ठेकेदारांची निविदा मंजूर झाली. त्यापैकी एकाने ६ टक्के आणि दुस-याने १२ टक्के कमी दराने निविदा भरली आहे. अखेर महापालिकेने १२ टक्के कमी रकमेची सुमारे ८ कोटी ७६ लाख रुपयांची निविदा असणा-या ठेकेदाराला काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता. मात्र, महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत कमी रकमेच्या निविदाधारकांला मंजुरी देताना त्याला सव्वा कोटी वाढीव म्हणजे पूर्वगणकपत्रकानुसार ९ कोटी ९९ लाख रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, त्यामध्ये नेमके कोणते रस्ते दुरुस्त करणार, त्यांची लांबी असा कोणताही उल्लेख पूर्वगणकपत्रकात नाही. तरीही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोघम निधी मंजूर करण्यात आला आहे. एका बाजुला स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी महापालिकेच्या जमा-खर्चात २०० कोटीचा तोटा असल्याने वर्गीकरणाचे प्रस्ताव स्थगित केले आहेत. त्याचवेळी ठेकेदारावर सव्वा कोटीची मेहरबाणी करणारा प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे पावसाळापूर्व निधीचा प्रस्ताव वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. ----------------------- 'पावसाळापूर्व रस्त्याची कामे व पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजविण्यासाठीची निविदा होती. परंतु, आपत्त्कालीन परिस्थितीत वाढीव कामे करावी लागतात. त्यामुळे पूर्वगणकपत्रकानुसार निधी मंजूर करण्याचा आग्रह प्रशासनाने धरला. ऐनवेळी निधीची कमतरता भासू नये म्हणून वाढीव निधीला सर्वानुमते मान्यता दिली आहे. '- बापूराव कर्णे, अध्यक्ष, स्थायी समिती. ---------------------