शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

स्टॉल लिलावावरून नगरसेवकांत तू, तू-मैं-मैं

By admin | Updated: March 6, 2016 01:12 IST

दौंड नगर परिषदेने बांधलेल्या स्टॉलच्या लिलावाच्या प्रश्नावर दौंड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांत गरमागरम चर्चा झाली

दौंड : दौंड नगर परिषदेने बांधलेल्या स्टॉलच्या लिलावाच्या प्रश्नावर दौंड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांत गरमागरम चर्चा झाली. गाळ्यांचे लिलाव जाहीर पद्धतीने करण्यात यावेत, अशी भूमिका काहींनी घेतली, तर लिलाव करताना सर्वसामान्यांचाही विचार व्हावा, अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेतली. दौंडच्या आठवडेबाजाराजवळील नव्याने बांधलेली चिकन व मटण दुकाने तसेच दैनंदिन मंडईमध्ये नव्याने बांधलेले ओटे जाहीर लिलाव करून देण्यात यावेत, असा प्रस्ताव मांडल्यानंतर नगरसेवक बादशहा शेख म्हणाले, की लिलाव पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले लोक हे स्टॉल घेतील; मात्र ज्यांनी आयुष्य भाजीपाला विक्रीमध्ये घालवले त्यांना तुम्ही काय देणार? यामुळे गोरगरिबांचा विचार करून त्यांना गाळे द्यावेत, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावर मुख्याधिकारी शिवाजी कापरे म्हणाले, की नियमानुसार लिलावाद्वारेच स्टॉलची विक्री केली जाईल. एखाद्या माणसाने स्टॉल घेतला आणि त्यात पोटभाडेकरू घातला, तर त्याच्याकडून नियमाने पुन्हा स्टॉल परत घेण्याचा अधिकार नगर परिषदेला आहे. यावर नगरसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले, की बादशहा शेख यांनी योग्य मत मांडले; परंतु जे काही करायचे ते कायद्यानेच झाले पाहिजे. गुरुमुख नारंग म्हणाले, की गावात मटण आणि चिकन यांची दुकाने किती आहेत त्याची आकडेवारी द्या. परंतु, आकडेवारी पाहण्यातच वेळ गेल्याचे नगरसेवक राजू बारवकर म्हणाले. अंदाजे आकडा सांगा, असे म्हणताच गुरुमुख नारंग म्हणाले, अंदाजपंचे आकडेवारी देण्यासाठी हा काय खेळ आहे का?नगराध्यक्षा अंकुशाबाई शिंदे म्हणाल्या, ‘‘सभागृहाचा वेळ वाया घालवू नका. विषयपत्रिका आधीच मिळते. विषयपत्रिकेचा अभ्यास करून त्यानुसार सुरुवातीलाच माहिती मागवली पाहिजे’’ यावर गुरुमुख नारंग आणि अनिल साळवे म्हणाले, की माहितीच मिळत नाही; त्यामुळे माहिती मागविण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, हे लिलाव करताना नगर परिषदेने पारदर्शकता ठेवली पाहिजे.नगरसेविका शीतल मोरे, नगरसेविका आकांक्षा काळे यांनी सामाजिक बांधिलकीतून प्रश्न उपस्थित केले. या विषयासह अन्य काही विषयांवर चर्चा करण्यात आली.