शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कार्यशाळेतील बसबांधणीचे काम थंडावले

By admin | Updated: December 26, 2016 03:24 IST

एकेकाळी बसबांधणी क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या दापोडी एसटी कार्यशाळेतील काम सद्य:स्थितीत थंडावले आहे.

संजय माने / पिंपरीएकेकाळी बसबांधणी क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या दापोडी एसटी कार्यशाळेतील काम सद्य:स्थितीत थंडावले आहे. महापालिकांच्या परिवहन समित्यांकडून बस खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. एसटीच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्याही घटली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेतील बसबांधणीचे काम थंडावले आहे. दर्जेदार बसबांधणीसाठी अग्रेसर असलेल्या दापोडीतील मध्यवर्ती कार्यशाळेला ६५ वर्षे झाली. १९५१ मध्ये दापोडीतील २६ एकर जागेवर पीडब्ल्यूडी वर्कशॉपलगत ही कार्यशाळा साकारली. नव्या चॅसिजवर बसची बांधणी करणे, राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील राज्यभर धावणाऱ्या बसगाड्यांची काही वर्षांनी पुनर्बांधणी करणे, टायर रीमोल्डिंग अशा स्वरूपाची कामे या कार्यशाळेत केली जात आहेत. अत्यंत मजबूत आणि टिकाऊ बसबांधणी हे या कार्यशाळचे वैशिष्ट्य मानले जात असल्याने दुसऱ्या राज्यातील परिवहन खात्याच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसगाड्या दापोडी कार्यशाळेत पाठविल्या जात होत्या. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसबांधणीकरिता स्थापन झालेली ही कार्यशाळा उच्च दर्जाच्या बसबांधणीसाठी इतर राज्यांसाठीही महत्त्वाची ठरली. गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यांतील बससुद्धा बांधणीसाठी दापोडीतील कार्यशाळेत पाठवल्या जायच्या. एवढेच नव्हे, तर लष्कारासाठी आवश्यक असणाऱ्या बसगाड्यांची कार्यशाळेतील सुमारे साडेतीन हजार कामगारांना हे काम उरकत नव्हते. कामाचा व्याप वाढल्याने औरंगाबाद, नागपूर येथे कार्यशाळा सुरू कराव्या लागल्या. परिवहन महामंडळाच्या वतीने दापोडीसह अन्य दोन कार्यशाळा सुरू झाल्या. त्या ठिकाणीही बसबांधणीचे काम केले जात आहे. परंतु औरंगाबाद, नागपूर येथील कार्यशाळांच्या तुलनेत कार्यशाळेत बस बांधणीचे काम मोठ्या स्वरूपात केले जात होते. प्रतिदिन या वर्कशॉपमधून एक बस तयार होत असे. आता केवळ जुन्या बस पुनर्बांधणीसाठी या कार्यशाळेत येतात. सद्य:स्थितीत दापोडीतील कार्यशाळेत काम करणाऱ्या कामगारांची संख्या ७०० आहे.कामगारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे४दापोडी एस टी कार्यशाळेतील बसबांधणीचे काम कमी झाल्याने कामगार विवंचनेत आहेत. पूर्वीच्या तुलनेत विविध परिवहन संस्थांचे बस खरेदीचे प्रमाण कमी झाले असून, त्याचा परिणाम एसटी कार्यशाळेच्या कामावर होत आहे. एसटीचे खासगीकरण करण्यासंदर्भातील हालचाली सुरू असल्याच्या वार्ता कानावर पडू लागल्याने कामगार चिंता व्यक्त करू लागले आहेत. कामगारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून, एसटी आणि कार्यशाळेचे अस्तित्व अबाधित राखले जावे, यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण४एशियाड (निमआराम), डीलक्स या प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावणाऱ्या आलिशान,आरामदायी बसगाड्या याच वर्कशॉपमध्ये तयार झाल्या. राज्य परिवहन महामंडळाची ही मध्यवर्ती कार्यशाळा असल्याने बसबांधणी कामात दर्जाबाबत कसलीही तडजोड केली जात नव्हती. त्यामुळे बसखरेदीस विलंब झाला, तरी जुन्या बस अधिक काळ रस्त्यावर धावतील अशा पद्धतीचे उत्कृष्ट काम या वर्कशॉपमध्ये झाले. अलीकडच्या काळात काम कमी झाल्याने कामगार वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.