शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे प्रवासी खासगी वाहतुकीकडे

By admin | Updated: March 23, 2016 00:59 IST

होळी, धूलिवंदनामुळे सलग पाच दिवसांची शासकीय सुटी आल्याने सणांसाठी गावाकडे निघालेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) प्रवासी खासगी वाहतुकीच्या जाळयात अडकत आहेत

पुणे : होळी, धूलिवंदनामुळे सलग पाच दिवसांची शासकीय सुटी आल्याने सणांसाठी गावाकडे निघालेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) प्रवासी खासगी वाहतुकीच्या जाळयात अडकत आहेत. दोन दिवसांपासून स्थानकांत प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन खासगी वाहतूकदारांचे एजंट थेट स्थानकाच्या आतमध्ये येऊन प्रवासी पळवून घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे, अशा प्रवासी पळविण्याच्या घटना वाढत असल्याची गंभीर दखल घेऊन काही महिन्यांपूर्वीच उच्च न्यायालयानेच एसटी स्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहतुकीला मज्जाव करण्याच्या सूचना वाहतूक पोलीस, एसटी प्रशासन तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिलेल्या असतानाही त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे लोकमतने स्वारगेट, पुणे स्टेशन तसेच शिवाजीनगर बस स्थानक येथे केलेल्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार समोर दिसत असतानाही केवळ कारवाईचा कोणताही अधिकार नसल्याने एसटीचे कर्मचारी हतबलपणे हा प्रकार पाहत असल्याचेही या पाहणीत दिसून आले.> न्यायालयाच्या आदेशाचे काय ?२ महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने एसटी स्थानकांच्या २०० मीटर परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मज्जाव करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशानंतरही या वाहनांना बंदी घालण्यासाठी कोणत्याही यंत्रणेने पावले उचलली नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार, एसटी प्रशासनाकडून स्थानकांच्या परिसरातील अशा प्रवासी वाहनांचे क्रमांक तसेच गाडीची माहिती एकत्र करून दररोज स्थानिक पोलीस ठाणे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाला यादीसह पाठविली जात आहे. मात्र, त्यानंतर त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली किंवा नाही, याची माहिती ना पोलिसांकडे आहे, ना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे. त्यामुळे या दोन्ही विभागांना न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यास वेळ नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.> प्रवेशद्वारालाच एजंटांचा विळखा एसटीच्या प्रमुख तिन्ही बस स्थानकांच्या प्रवेशद्वाराजवळच हे एजंट प्रवाशांच्या शोधात असल्याचे दिसून आले. एसटी स्थानकात ज्या ठिकाणी प्रवासी आत येतात, त्या ठिकाणी गराडा घालून एजंट प्रवाशांना आधी कुठे जायचे, याची विचारणा करताता. जर प्रवाशाने प्रतिसाद दिला नाही, तर स्वत:च बस जाणाऱ्या गावांची नावे जोरजोरात पुकारतात. तसेच, ‘दोनच जागा शिल्लक, अवघ्या काही तासांतच पोहोचविणार तसेच संबंधित गावाला जाण्यासाठी अवघे काही तिकिटाची रक्कम कमी करण्याचे आश्वासन’ही ते देतात. तर, काही एजंट चक्क बस थांबणाऱ्या फालटाच्या ठिकाणी जाऊनच प्रवाशांना खासगी बसने जाण्याची गळ घालताना दिसले. स्वारगेटहून कोल्हापूरला जाणाऱ्या एका बसमध्ये चक्क एक एजंट ‘बसला सुटण्यास अर्धा तास आहे, तर खासगी बस १० मिनिटांत सुटणार असून अवघ्या दोन ते तीन जागा आहेत,’ असे सांगून एका तरुण प्रवाशाला बसमधून खाली उतरवून घेऊन जाताना दिसून आला.