शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

काळदरी घाटात एसटी बस कोसळली, झाडामुळे जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:32 IST

पुरंदर तालुक्यातील काळदरी येथे सासवड येथून पानवडीमार्गे काळदरीकडे जात असताना घाटात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एसटी बस साधारण ६० फूट खोल दरीत कोसळली.

गराडे : पुरंदर तालुक्यातील काळदरी येथे सासवड येथून पानवडीमार्गे काळदरीकडे जात असताना घाटात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एसटी बस साधारण ६० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २२ प्रवाशांपैकी १६ जण किरकोळ जखमी झाले. जखमींना सासवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.सासवड पोलीस ठाण्यात मधुकर तुकाराम लडकत (वय ५४, रा. जेजुरी) या चालकावर निष्काळजीपणाने गाडी चालवून १५ जणांना दुखापत केली असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; पण बस आंब्याच्या झाडाला अडकल्यामुळे जीवितहानी टळली. जखमी प्रवाशांमध्ये भरत दशरथ परखंडे (वय ४0), दामोदर लक्ष्मण पिसाळ (वय ७0), रत्नाबाई महादेव राऊत (वय ६५), सुरेखा अंकुश परखंडे (वय ४५), सिंधूबाई अनंता जगताप (वय ६४), अनंता भिवा जगताप (वय ६८, सर्व राहणार काळदरी), रामदास सखाराम थोपटे (वय ६0), शांताबाई रामदास थोपटे (वय ६0), श्रीरंग मारुती गायकवाड (वय ७५, सर्व. राहाणार थोपवाडी), मारुती दगडू पवार (वय ७१, कुंजीरवाडी), गिरजाबाई रखमाजी बेंगळे (वय ६५), रखमाजी बापू बेंगळे (वय ७0), दादू मनोहर सूर्यवंशी (वय ६0, सर्व राहणार बहिरवाडी), हिराबाई शिवराम वाडकर (वय ६५, रा. रामवाडी), सुरेश पांडुरंग हराळे (वय ५६, रा. न्हावी, ता. भोर), मधुकर तुकाराम लडकत (वय ५४, रा. जेजुरी) हे वाहनचालक जखमी झाले आहेत.