शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

एसआरएची साह्य समिती रद्द

By admin | Updated: October 29, 2016 04:35 IST

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आर्किटेक्टकडून धमकावल्याच्या प्रकाराची पालकमंत्र्यांनी शुक्रवारी गंभीर दखल घेऊन कारवाईचा

पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आर्किटेक्टकडून धमकावल्याच्या प्रकाराची पालकमंत्र्यांनी शुक्रवारी गंभीर दखल घेऊन कारवाईचा इशारा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी अचानक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एसआरएची साह्य समिती रद्द करण्याचे आदेश नगरविकास मंत्रालयातून काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.पुणे शहरात ४८६ झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांचे रूप पालटण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविली जात आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड क्षेत्रासाठी झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण निर्माण करण्यात आले आहे. शहरातील मोक्याच्या जागांवर असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा महत्त्वाचा विषय असल्याने या प्राधिकरणाचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना याचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे असावे की पालकमंत्र्यांकडे, यावरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना याचे पदसिद्ध अध्यक्षपद देण्यात आले होते. त्याचबरोबर, प्राधिकरणाला मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ जानेवारी २०१६ रोजी साह्य समिती गठित करण्यात आली. या समितीत पालकमंत्र्यांसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे महापौर आणि आयुक्त, विधान परिषद सदस्य आणि पोलीस आयुक्त आदी सदस्यांचा समावेश होता.शुक्रवारी मुंबईमध्ये एसआरएबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अचानक साह्य समितीच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी एसआरएच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना झालेली दमदाटी, या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी घातलेले लक्ष या पार्श्वभूमीवर सायंकाळी साह्य समितीच रद्द करण्याचा निर्णय झाल्याने विविध तर्कविर्तक लढविण्यात येत आहेत.(प्रतिनिधी)२००६ मध्ये झाली होती स्थापनासाह्य समितीची स्थापना २००६मध्ये झाल्यानंतर प्रत्यक्षात या समितीच्या खूपच कमी बैठका झाल्या. एसआरएची नियमावली २०१४मध्ये बदलण्यात आली. त्यानंतर एसआरए प्रकल्पाबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जुन्या प्रकल्पांना जुने नियम लागू आहेत की नवीन, यावरून बरेच वाद निर्माण झाले आहेत. यामुळे एसआरएच्या अनेक योजना रखडल्या आहेत. एसआरए प्रकल्पाच्या कामात निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी साह्य समित्यांची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, समितीकडून प्रत्यक्षात त्यासाठी खूपच कमी प्रयत्न झाले. एसआरएचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत, यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून दबाव वाढत चालला आहे. त्यातून वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.