शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी व्यक्तींकडून ‘बनवाबनवीचा’ खेळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 02:36 IST

ज्येष्ठ नागरिक होतात लक्ष्य : ऑनलाइनच्या आर्थिक व्यवहारात होतेय फसवणूक

पुणे : नवीन एटीएमचा पिन नंबर, पासवर्ड बदलण्याच्या निमित्ताने, पैसे काढण्याच्या उद्देशाने ऑनलाइनच्या व्यवहारात सध्या मोठ्या संख्येने गुन्हे वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यात ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष्य केले जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. कित्येक घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या असहायता आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक होण्याचे प्रकार शहरात सातत्याने होत आहेत.

चंदननगर भागात एटीएम मशिन गॅसकटरच्या साह्याने फोडून २१ लाखांची रोकड नेली. तर, खडक भागात बँकेतूनच नजर चुकवून २८ लाखांची रोकड असणारी पेटी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. अद्याप हे चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या टोळ्या परराज्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड व त्यांचे कर्मचारी मेमाणे, कापरे व चिरमे हे गुरुवारी पहाटे हद्दीत गस्त घालत होते. साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांना जंगली महाराज रस्त्यावर आल्यानंतर बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिनमध्ये दोन तरुण असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यांची झडती घेतली असता त्यांना १८ एटीएम व १६ हजारांची रोकड सापडली.

दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. अधिक तपास केला असता छेडछाड करून पैसे काढल्याची कबुली दिली. तर, त्यांचा एक साथीदार सोडून गेल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी संबंधित बँकेला माहिती दिली. यानंतर पोलिसांकडे धाव घेतली.‘त्या’ दोघांकडून मिळाले १८ एटीएम कार्डकार्ड मशिनमध्ये टाकून पिन क्रमांक व रक्कम टाकली जाते. रक्कम बाहेर येताच आरोपी एटीएम मशिनमध्ये छेडछाड करत. त्यामुळे त्यांना पैसेही मिळत होते आणि खात्यावरून पैसेही जात नव्हते. यानंतरही हे आरोपी बँकेलाच आमचे ट्रान्झॅक्शन फेल झाले असून, पैसे मिळाले नसल्याचे सांगत. त्यामुळे बँकेलाच आर्थिक भुर्दंड बसत होता. दोघांकडून १८ एटीएम कार्ड मिळाले आहेत. याबाबत आणखी चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक लगड यांनी सांगितले.