शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘रक्ताचं नातं’ मोहिमेस रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:08 IST

पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’तर्फे राज्यभर ...

पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’तर्फे राज्यभर ‘रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत रक्तदान मोहीम चालू केली आहे. यात शनिवारी शहरातील भवानी पेठ, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, पाषाण या ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. त्यास रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येत्या पंधरा जुलैपर्यंत ही मोहिम पुण्यासह राज्यभर सुरु राहणार आहे.

‘लोकमत’च्या सहकार्याने पोलीस मित्र शांतीदूत परिवार, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय), वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंटस स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) डीएमकेएच अ‍ॅण्ड कंपनी, राठी आणि कंपनी यांच्यातर्फे शहरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. पोलीस मित्र शांती दूत परिवार, भवानी पेठ येथे ओम ब्लड बँक यांच्या सहयोगाने शिबिर घेण्यात आले. यावेळी सदाशिव कुंदेन, अकबर मेमन तसेच सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव , डॉ. चंद्रकांत मंडलिक, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, राम पालखे, सुनील मेमाणे, अमित देवळेकर, मोईन चौधरी, किरण कांबळे, साजिद शेख, स्वाती गायकवाड, सिंधू शेलार आदी उपस्थित होते.

आयसीएआयतर्फे बिबवेवाडी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात एकूण सव्वादोनशे जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास आयसीएआयचे केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशीनाथ पठारे, ‘विकासा’चे उपाध्यक्ष अथर्व खुर्द, सदस्य प्राची शर्मा, सीए अजयकुमार राजे, कार्यालयीन व्यवस्थापक दीपक कोरगावकर आदी उपस्थित होते.

शनिवारी पुण्यात आयसीएआय भवन, बिबवेवाडी येथे केईएम रक्तपेढीच्या सहकार्याने १७, डीएमकेएच, फॉरचुन हाऊस, बाणेर-पाषाण लिंक रस्ता येथे डॉ. डी. वाय. पाटील ब्लड बँक पिंपरी चिंचवड यांच्या सहकार्याने ३९ आणि राठी अँड राठी कंपनी, कमल कीर्ती, सिंहगड रस्ता येथे पूना हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या सहकार्याने ६५ जणांनी रक्तदान केले. सीए सुहास बोरा, सीए मोहित अगरवाल, सीए दिनेश मुंदडा, सीए शैलेंद्र पवार, सीए शैलेश राठी, सीए पराग राठी, सीए विक्रांत साळुंके, सीए निलेश देशमुख यांनी यामध्ये पुढाकार घेतला.

चौकट

“कोरोनामुळे सध्या अनेक रुग्णालयांना रक्ताचा पुरवठा आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे ‘लोकमत’च्या उपक्रमात सीए दिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. सर्व सीए सभासद, विद्यार्थ्यी यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.”

-सीए समीर लड्डा ,अध्यक्ष,आयसीएआय, पुणे शाखा