शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

तोतयांचे फुटले पेव !

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

चित्रपटांच्या कथानकांना शोभणाऱ्या फसवणुकीच्या घटना अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहेत. कोट्यवधी रुपयांना ‘स्पेशल २६’ स्टाईल गंडा घालणारे ठग मात्र

पुणे : चित्रपटांच्या कथानकांना शोभणाऱ्या फसवणुकीच्या घटना अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहेत. कोट्यवधी रुपयांना ‘स्पेशल २६’ स्टाईल गंडा घालणारे ठग मात्र पोलिसांना गुंगारा देत फिरत आहेत. कधी पोलीस अधिकारी, कधी व्यावसायिक बनून, तर कधी चक्क लग्नाच्या आमिषाने नागरिकांना लुबाडण्यात येत आहे. या घटनांमध्ये सर्वाधिक बळी पडणाऱ्यांची संख्या सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांची आहे.मल्टीनॅशनल कंपनीचा मालक असल्याची बतावणी करीत चंदुकाका सराफ पेढीचे १०० तोळे सोने लंपास करण्यात आल्याची घटना गेल्याच आठवड्यात चंदननगर भागात घडली. गोवर्धनदास संतोष ऊर्फ स्टीव्हन संतोष नावाच्या ठगाने खराडी येथील रिगस आॅरगॉन टेक वर्ल्ड सेंटर युआॅन आयटी पार्क येथे सेमिनार असल्याचे भासवले. स्वत: मल्टीनॅशनल कंपनीचा मालक असल्याची बतावणी करीत त्याने कामगारांना देण्यासाठी चंदुकाका सराफाकडून ८ ते १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या नाण्यांची आॅर्डर दिली. सोन्याची नाणी घेऊन आलेल्या व्यवस्थापकांना गुंगारा देत हा ठग दुस-या दरवाजाने सहजरित्या पसारही झाला. स्पेशल २६ चित्रपटातील कथानकाला शोभेल अशा प्रकारे त्याने ३२ लाख रूपयांचे सोने लंपास केले.स्वत:ला केंद्र शासनाचा ‘व्हिजीलंस आॅफीसर’ असल्याची बतावणी करीत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणा-या विशाल पांडुरंग ओंबाळे (वय ३८, रा. स्पार्टन एन्क्लेव्ह सोसायटी, येरवडा) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. एक साधा हॉटेल कामगार ते कोट्यधीश असा त्याचा प्रवास फसवणूक आणि बनवेगिरीच्या माध्यमातून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्याने कधी धमकी देऊन तर कधी मोठ मोठी कामे करण्याचे आमिष दाखवत कोट्यवधींची माया जमवल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तर गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने तोतया महसूल अधिका-याला अटक केली. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे बहाण्याने त्याने एकाची १८ लाखांची फसवणूक केली होती. छोटा राजनच्या मेव्हण्याशी जवळचे संबंध असल्याची बतावणी करीत त्याने तक्रारदाराला ठार मारण्याची धमकी दिली होती.काही महिन्यांपुर्वी भारती विद्यापीठ पोलिसांनीही कधी स्वत:ला म्हाडाचा अधिकारी, कधी उपायुक्त, कधी सहायक आयुक्त म्हणवून घेणा-याला पकडले होते. मोटारी भाड्याने देणा-या व्यावसायिकांना फोन करुन भाड्याने घेतलेल्या गाड्याच लंपास करीत होता. त्याने अनेक महिलांवर बलात्कार केल्याचेही नंतर तपासात समोर आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्काराचेही गुन्हे दाखल आहेत.वारजे भागात तोतया वाहतूक पोलीस निरीक्षकाला पकडण्यात आले होते. साथीदारासह भर रस्त्यावर पोलीस निरीक्षकाच्या गणवेशातील हा तोतया वाहनचालकांकडून पैसे उकळत होता. तर कोरेगाव पार्क पोलिसांनी एका तोतया आयपीएस अधिकाऱ्यालाच बेड्या ठोकल्या होत्या. गावी राजकीय पुढाऱ्यांकडून आयपीएस झाल्याबद्दल सत्कार स्विकारलेल्या या तोतयाने कोरेगाव पार्क भागात आलिशान सदनिका भाड्याने घेतली होती. आयपीएसचा गणवेश, अंबर दिवा आणि आलिशान मोटार असा या तोतयाचा थाट होता.लूटमारीत पोलीसही नाहीत मागे : मोठ्या परताव्याचे आमिषहडपसर पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षकाने एका कंपनीचे ९६ लाख रुपये लुटल्याची घटना ताजी आहे. त्याच्यासह एका पोलीस कर्मचाऱ्यालाही अटक झाली होती. पुण्यातील प्रख्यात कयानी बेकरीच्या मालकाला तोतया सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी २५ लाखांना लुटल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. यामध्ये बीडीडीएसचे पोलीस कर्मचारीच सहभागी झाले होते. त्यांनाही अटक झाली होती. पनवेल येथील दोन कोटी रुपयांच्या दरोड्यामध्ये तत्कालीन डेक्कन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकाच्या मोटारीवरील चालकच सहभागी झाला होता.मोठ्या परताव्याच्या आमिषाने जमीन, म्युच्युअल फंड, विमा पॉलिसी आणि क्रेडिट सोसायट्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात येत आहे. यासंदर्भात शेकडो गुन्हे पोलीस दफ्तरी दाखल होत आहेत. परंतु आर्थिक गुन्ह्यांचा तपास लावण्याचे कसब असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे हे गुन्हे तपासावर प्रलंबित राहात आहेत.मॅट्रीमोनी साईटवरून फसवणूकलग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर (वेबसाईट) नावनोंदणी केलेल्या विधवा किंवा दुसरे लग्न करू इच्छिणाऱ्या महिलांना लग्नाच्या आमिषाने जाळ्यात ओढण्याचे प्रमाण वाढते आहे. या महिलांशी संपर्क साधून त्यांना विदेशामधून महागड्या भेटवस्तू पाठवण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांना लुबाडण्यात येत आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता. सॅलिसबरी पार्कमधील ५० वर्षीय महिलेला ५० लाखांना गंडवण्यात आले होते. तर नुकतेच हडपसरमध्येही अशाच प्रकारे एका महिलेला ३५ लाखांना गंडवण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे.