शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्माचे सूत्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते

By admin | Updated: April 26, 2015 01:25 IST

सामान्य माणसांच्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वरांची प्रतिमा शाहू मोडक यांच्या रूपात दिसते, कारण त्यांनी मालिकांमधून तो अभिनय उत्तमरीत्या रेखाटला;

पुणे : सामान्य माणसांच्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वरांची प्रतिमा शाहू मोडक यांच्या रूपात दिसते, कारण त्यांनी मालिकांमधून तो अभिनय उत्तमरीत्या रेखाटला; त्यामुळे अध्यात्माचे सूत्र मोडक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि त्यांच्या चरित्रामध्ये दिसते, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.शाहू मोडक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने, २१वा शाहू मोडक स्मृती पुरस्कार बालकलाकार श्रुती कार्लेकर, बालगायक अद्वैत केसकर, जिद्द हा सोनाली नवांगुळ, पंचांगकर्ते मोहन दाते यांना देण्यात आला, त्या वेळी मोरे बोलत होते. पुष्पगुच्छ, प्रशस्तिपत्रक सन्मानचिन्ह, रोख ७ हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी नाट्य संमेलनाध्यक्ष फय्याज, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश बापट, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रतिभा मोडक, रवींद्र घाटपांडे उपस्थित होते.मोरे म्हणाले, ‘‘मोडक यांनी जात, धर्म, भाषा यांना महत्त्व दिले नाही. त्यांनी धर्माचा सखोल अभ्यास केला होता. अभिनय करताना ते अंतर्मनातून करायचे.’’ बालकलाकार कार्लेकर हिने रमा-माधव चित्रपटातील छोटासा अभिनय करून दाखविला. (प्रतिनिधी)४पुरस्कारार्थी दाते म्हणाले, ‘‘पंचांग या क्षेत्रातील पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. भारतीय संस्कृती जतन करण्याचे काम पंचांग करते, पंचांगाचे स्वरूप बदलत असले तरी मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत आहे.’’४फय्याज म्हणाल्या, ‘‘मोडक यांच्याबरोबर काम करण्याचा योग मला मिळाला, याबद्दल मी भाग्यवान आहे. त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम केले.’’४बापट म्हणाले, कोणी पैशासाठी, कोणी प्रसिद्धीसाठी कलाकार होतात; पण शाहू मोडक हे त्यांच्या कलेसाठी जगले व तेच अजरामर झाले. आजही ज्यांची जात-धर्म सांगावा लागतो त्यांनाच शाहू मोडक म्हणतात.