शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्याच्या दुहेरी हत्येच्या तपासासाठी विशेष पथक

By admin | Updated: May 7, 2017 02:38 IST

लोणावळा येथे महिनाभरापूर्वी झालेल्या तरुण-तरुणीच्या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लोणावळा येथे महिनाभरापूर्वी झालेल्या तरुण-तरुणीच्या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या खुनाविषयी माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात येत असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.२ ते ३ एप्रिलदरम्यान भुशी धरणाजवळ अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या तरुण-तरुणीचा मृतदेह आढळला होता. महिना उलटूनही या खुनाचा तपास लागलेला नाही. हक म्हणाले, ‘‘या घटनेतील युवकाच्या डोक्याच्या मागे कठीण वस्तूने प्रहार झाल्याचे आणि युवतीच्या हनुवटीवर दगडाने मारल्याचे शवविच्छेदन अहवालात दिसून आले आहे. डीएनए तपासणीचा अंतिम अहवाल येत्या आठवड्यात प्राप्त होईल.’’ या घटनेमागील धागेदोरे अद्याप हाती आलेले नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विशेष तपास पथक स्थापन करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण, ३ खासगी सायबर तज्ज्ञ, अशा गुन्हयांंचा तपास करण्यात तज्ज्ञ असलेले, सध्या बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये नियुक्त असलेले अधिकारी अशा ५० जणांचा समावेश या पथकामध्ये असेल. या पथकासाठी लोणावळा किंवा खंडाळा येथे खास कार्यालयही निर्माण करण्यात येणार असून आपण स्वत: या पथकावर देखरेख व नियंत्रण करणार आहोत.  या खुनाविषयी कोणाला काही माहिती असल्यास ती ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी.