खडकवासला : दोन दिवसांची सुट्टी व त्या पार्श्वभूमीवर सिंंहगड खडकवासला परिसरात पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला गेला. याविषयीची माहिती पोलीस दलाच्या हवेलीच्या उपअधीक्षक वैशाली कडूकर यांनी दिली.खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरण्यास व चौपाटीवर पाण्याच्या बाजूला वाहने उभी करण्यास बंदी करण्यात आली. या परिसरातील सिंंहगड किल्ला, सिंंहगड घाट रस्त्यात कोंढणपूर फाटा, डोणजे-गोळेवाडी, खडकवासला धरण चौपाटी या परिसरात हा बंदोबस्त ठेवला गेला. त्यामुळे धरण परिसरात गर्दी नव्हती.१५ आॅगस्ट व रविवार अशा दोन सुट्ट्या असल्याने बंदोबस्त व धरण क्षेत्रात उतरण्याची मनाई असल्याने पर्यटकांनी सिंहगडावर अधिक गर्दी केली होती.(वार्ताहर)
धरण परिसरात विशेष बंदोबस्त
By admin | Updated: August 17, 2015 02:25 IST