शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी विशेष फेरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:21 IST

इयत्ता अकरावीसाठी महाविद्यालयांमध्ये अद्याप प्रवेश न मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या विशेष फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या फेरीची प्रक्रिया दि. ११ आॅगस्टपासून सुरू होणार आहे.

पुणे : इयत्ता अकरावीसाठी महाविद्यालयांमध्ये अद्याप प्रवेश न मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या विशेष फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या फेरीची प्रक्रिया दि. ११ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने पसंतीक्रम पुन्हा नव्याने भरणे आवश्यक आहे. पसंतीक्रम न भरल्यास फेरीत सहभागी होता येणार नाही.इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठीची नियमित चौथी फेरी सध्या सुरू आहे. ही फेरी बुधवारी पूर्ण होणार होती; मात्र या फेरीची मुदत गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी काही वेळ मिळणार आहे. या फेरीअखेरपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळालेला नाही; तसेच प्रवेशासाठी निवड होऊनही अनेक विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतलेला नाही. काही विद्यार्थ्यांनी अद्याप आॅनलाइन प्रक्रियेतही सहभाग घेतला नाही. पहिल्या पसंतीक्रमानुसार निवड झालेल्या, मात्र प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ब्लॉक करण्यात आले होते.विशेष फेरीसाठी दि.१० आॅगस्ट रोजी रिक्त जागांची माहिती व कटआॅफ संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल. त्यानंतर दि.११ आॅगस्टपासून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या फेरीत दहा पसंती क्रम भरणे बंधनकारक आहे. या फेरीमध्ये पूर्वी दिलेले पसंतीक्रम रद्द होतील.अपूर्ण अर्ज भरता येणारविद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबविली जाणार आहे. या फेरीचे वेळापत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी बुधवारी प्रसिद्ध केले. या फेरीत सहभागी होण्यासाठी संबंधित सर्व विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार नवीन अर्ज, अर्जाचा दुसरा भाग, तसेच अपूर्ण अर्ज भरता येणार आहेत.विशेष फेरीत कोण सहभागी होऊ शकते ?यापूर्वी प्रवेश घेतलेले विद्यार्थी वगळून सर्व विद्यार्थीपहिला पसंतीक्रम मिळवूनही प्रवेश न घेतलेलेप्रवेश रद्द केलेलेप्रवेश नाकारलेलेमहाविद्यालय अ‍ॅलॉट होऊनही प्रवेश न घेतलेलेपसंतीक्रम भरण्याची प्रक्रियासंकेतस्थळावर पूर्वीचाच आयडी व पासवर्ड टाकून लॉगीन करणे.‘माय स्टेटस’मधील रजिस्ट्रेशन फार्म पार्ट २ क्लिक करून विज्ञान विषयातील १०० पैकी गुण भरणे.त्यानंतर शाखा व माध्यम निवडणेचॉइस आॅफ सेंट्रलाइज्ड पेजवरील फिल्ड युवर चॉइसेसवर क्लिक करून पसंतीक्रम भरणे.सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर फॉर्म जमा होईल.पहिल्या विशेषफेरीचे वेळापत्रकदि. १० आॅगस्ट - दुपारी २ वाजेपर्यंत - चौथ्या फेरीतील अ‍ॅलॉट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशसायंकाळी ५ वाजेपर्यंत - रिक्त जागांची माहिती व कटआॅट प्रसिद्ध करणे४दि. ११ व १२ आॅगस्ट -नवीन अर्ज, भाग दोन व अपूर्ण अर्ज भरणे४दि. १६ आॅगस्ट -सायंकाळी ५ वाजता - गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे४दि. १८ व १९ आॅगस्ट -गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणेअर्जाचा भाग १ पूर्ण असलेले, परंतु भाग २ अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला मार्गदर्शन केंद्रावर जाऊन भाग एक अप्रुव्ह करून घ्यावा लागेल. त्यानंतर भाग दोन भरता येणार आहे. तसेच, एकदाही आॅनलाइन अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका घेऊन त्यातील आयडी व पासवर्डद्वारे लॉगीन करावे लागणार आहे. त्यानंतर भाग एक भरून मार्गदर्शन केंद्रावर अप्रुव्ह करून घ्यावा लागेल. त्यानंतरही अर्जाचा भाग दोन भरता येईल.