शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागातील मतदान केंद्रांवर संपर्कासाठी विशेष प्लॅन

By admin | Updated: February 21, 2017 01:44 IST

आंबेगाव तालुक्यातील ५ जिल्हा परिषद जागांसाठी २४ तर १० पंचायत समितीच्या जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात उभे असून

 घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील ५ जिल्हा परिषद जागांसाठी २४ तर १० पंचायत समितीच्या जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात उभे असून, एकूण १७३४५९ मतदार या उमेदवारांचे भविष्य ठरविणार आहेत. निवडणुकीसाठी २२४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, येथे सर्व कर्मचारी, मतदान साहित्य व मतदान यंत्रणा तपासून केंद्रावर पोहोचले आहेत. तसेच तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागाचा विचार करता मतदानकाळात संपर्कासाठी विशेष प्लॅन तयार करण्यात आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश भालेदार यांनी सांगितले.तालुक्यातील १७३४५९ मतदारांमध्ये ८३८६६ स्त्रिया तर ८९५९३ पुरुष आहेत. यामध्ये आमोंडी/शिनोली गटात ३१०६२, घोडेगाव/पेठ गटात ३७५५७, कळंब/चांडोली बुद्रुक गटात ३४३९३, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक/अवसरी बुद्रुक गटात ३४८९०, मंचर/अवसरी खुर्द गटात ३५५५७ मतदार आहेत. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी २८ एसटी बस, ४५ जीप व १३ शासकीय जीप ठेवण्यात आल्या होत्या. सर्व साहित्याचे वाटप व जमा करण्याचे काम शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा घोडेगाव येथे होणार आहे. तहसील कार्यालयात १० स्वतंत्र मोबाईल फोन ठेवण्यात आले आहेत. या भागात जादा मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत, येथे मतदानकाळात झोनल आॅफिसला अडचणी आल्यास घ्यावयाच्या दक्षतेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलिसांनी ९ बेकायदा दारूधंद्यांवर कारवाई केली. सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (वार्ताहर)