शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी शुक्रवारी पालिकेत विशेष सभा

By admin | Updated: February 9, 2016 04:43 IST

शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी येत्या शुक्रवारी, १२ फेब्रुवारी रोजी विशेष मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी येत्या शुक्रवारी, १२ फेब्रुवारी रोजी विशेष मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी पाणीपट्टीमध्ये ५ वर्षांमध्ये ८७ टक्के वाढ करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे, त्यावर अंतिम निर्णय मुख्य सभेत घेतला जाणार आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडली आहे. या योजनेमध्ये पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यास मनसे, शिवसेना, काँग्रेस या पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये पाठिंबा दिला आहे. पाणीपट्टीमध्ये २०१६-१७ या वर्षासाठी १२ टक्के त्यानंतर २०२१ पर्यंत पुढील ५ वर्षे प्रत्येकी १५ टक्के त्यानंतर २०४७ पर्यंत प्रतिवर्षी ५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीवर आज चर्चामहापालिकेच्या इमारतींवर सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यासाठी खासगी ठेकेदाराला ठेका देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ठेकेदाराला ३० वर्षांसाठी हे काम दिले जाणार आहे. त्याकरिता देखभाल खर्च म्हणून त्याला महापालिकेला पैसे द्यावे लागणार आहेत. महापालिकेला या प्रकल्पातून स्वस्तात वीज मिळणार आहे. मात्र खासगी ठेकेदाराकडून वीजनिर्मिती करण्यापेक्षा महापालिकेने स्वत: वीजनिर्मिती करावी अशी मागणी स्थायी समितीच्या सदस्यांनी केली आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे.