शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वीज केंद्रासाठी जागेची मागणी

By admin | Updated: July 6, 2017 03:14 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील देहूरोड बाजारपेठ, विकासनगर मामुर्डी व शितळानगरसह महापालिका हद्दीतील विकासनगर भागातील

लोकमत न्यूज नेटवर्ककिवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील देहूरोड बाजारपेठ, विकासनगर मामुर्डी व शितळानगरसह महापालिका हद्दीतील विकासनगर भागातील वीज प्रश्न सोडविण्यासाठी वीज उपकेंद्रासाठी हव्या असणाऱ्या जागेचा प्रस्ताव संरक्षण विभागाकडून लवकर मार्गी लागावा़ तसेच सरकारी जागांवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांच्या मिळकतींना कर आकारणी बिले न देण्याबाबत रक्षा संपदा महासंचालकांनी देहूरोड बोर्ड प्रशासनाला दिलेल्या सूचनांबाबत फेरविचार करण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली देहूरोड कॅन्टोन्मेंटचे सदस्य व नागरिकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले़ भामरे यांनी संबंधित जागा लवकरात लवकर देण्याबाबत कार्यवाही करण्याचे सूचित केल्याचे बोर्डाच्या अर्थ समितीचे अध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी सांगितले. देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या देहूरोड बाजारपेठेसह विविध भागांत गेल्या वर्षांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महावितरणकडून वीज उपकेंद्राची उभारणी करण्यासाठी जागेची मागणी करण्यात आली होती. सदस्य विशाल खंडेलवाल यांच्या पुढाकाराने मांडलेला जागेचा प्रस्ताव बोर्डाने मंजूर करून सरंक्षण विभागाच्या दिल्ली येथील संबंधित वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आलेला असून, संबंधित जागा लवकर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच गेल्या आठवड्यात रक्षा संपदा महासंचालक जोजेनेश्वर शर्मा यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला भेट दिली. वीज उपकेंद्रासाठी पाठविलेला प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे भामरे यांनी स्पष्ट केल्याचे तसेच संबंधित मिळकतींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याचे खंडेलवाल यांनी सांगितले आहे. बैठकीत सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांच्या संबंधित मिळकतींना कराची बिले देणे थांबविण्याबाबत तसेच मिळकतीवरील क्रमांक काढून टाकण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यामुळे संबंधित सूचनांची अंमलबजावणी तूर्त करण्यात येऊ नये, याकरिता मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली बोर्डाच्या अर्थ समितीचे अध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू , ललित बालघरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लहू शेलार व अमोल नाईकनवरे यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली.