शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

जागा ३९७; अर्ज ६० हजार

By admin | Updated: March 23, 2017 04:40 IST

राज्यभरामध्ये बुधवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून पुणे शहर आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, कारागृह

पुणे : राज्यभरामध्ये बुधवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून पुणे शहर आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, कारागृह आणि लोहमार्ग विभागातील ३९७ जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी तब्बल ६० हजार तरुणांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवाजीनगर मुख्यालय, ग्रामीण पोलीस मुख्यालयासह लोहमार्ग मुख्यालयामध्ये ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पोलीस भरतीसाठी राज्यभरामधून आॅनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणांनुसार त्यांना संबंधित केंद्रांवर भरतीसाठी जाण्याचे मेसेज आणि माहिती पाठवण्यात आलेली होती. पुणे शहर आयुक्तालयासाठी एकूण २३९ पदे भरण्यात येणार असून त्यासाठी ३५ हजारांच्यावर अर्ज आलेले आहेत. तर ग्रामीण पोलीस आणि कारागृह पोलिसांची भरती प्रक्रिया एकत्रच राबवली जात आहे. ग्रामीण पोलिसांची ८० आणि कारागृहाच्या ४५ जागांसाठी पाषाण येथील मुख्यालयामध्ये प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी एकूण १६ हजार २४१ अर्ज आले आहेत. तर लोहमार्ग पोलिसांची भरती प्रक्रिया खडकी मुख्यालयात सुरू असून ३३ जागांसाठी साडेआठ हजार अर्ज आले आहेत. शहरातील भरतीसाठी पहिल्या दिवशी बोलावण्यात आलेल्या १ हजार उमेदवारांपैकी ३४८ जण गैरहजर राहीले. तर ८२ जण अपात्र ठरले आहेत. तर ग्रामीण आणि कारागृह भरतीसाठी आलेल्या ७११ जणांपैकी ६८३ जण पात्र ठरले. तर लोहमार्ग पोलीस दलाच्या भरतीसाठी ३७२ जण उपस्थित राहीले होते.