शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पेरणे, थेऊर गणांत राष्ट्रवादीला दिलासा

By admin | Updated: February 11, 2017 02:45 IST

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मतदारसंघातील दोन गणांतील महिलांचे अर्ज छाननीत बाद ठरविल्याने राष्ट्रवादी

लोणीकाळभोर/पुणे : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मतदारसंघातील दोन गणांतील महिलांचे अर्ज छाननीत बाद ठरविल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता़ मात्र, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असून या दोन्ही महिलांचे अर्ज मंजूर करून त्यांना उमेदवारी देण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार कावेरी कुंजीर (थेऊर गण) व संजीवनी कापरे (पेरणे गण) या दोन्ही महिलांच्या अर्जावर तीनपैकी एका ठिकाणी सही राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीत बाद ठरविले होते़ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरुद्ध त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली़ अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयदीप वडणे यांच्यासमोर शुक्रवारी या अर्जांवर सुनावणी झाली़ उमेदवारांच्या वतीने अ‍ॅड़ प्रताप परदेशी आणि अ‍ॅड़ सी़ के. भोसले यांनी सांगितले, की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस दिली तरी त्यात तुमचा अर्ज अपुरा आहे, असे म्हटले नव्हते़ त्यांचा आॅनलाईन अर्ज योग्य आहे़ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्जाची छाननी करताना कोणती काळजी घ्यायची, याच्या मार्गदर्शक सूचना सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात दिल्या आहेत, त्याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले़ न्यायालयाने त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून कावेरी कुंजीर आणि संजीवनी कापरे या दोन्ही महिलांचे अर्ज मंजूर करून त्यांना उमेदवारी देण्याचा आदेश दिला आहे़ (वार्ताहर)