शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत गव्हाच्या नीचांकी पेरण्या

By admin | Updated: November 24, 2015 00:45 IST

यंदाच्या वर्षी घटलेल्या पर्जन्यमानाचा फटका रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. बारामती उपविभागामध्ये रब्बी हंगामातील ज्वारीच्या केवळ ३३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत

बारामती : यंदाच्या वर्षी घटलेल्या पर्जन्यमानाचा फटका रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. बारामती उपविभागामध्ये रब्बी हंगामातील ज्वारीच्या केवळ ३३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर, गव्हच्या लागवड क्षेत्रात नीचांकी घट झाल्याचे समोर आले आहे. पुरंदर तालुक्यात गव्हाची लागवड करण्यात आलेली नाही, तर आलेले पीक पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहे. बारामती उपविभागामध्ये बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांचा समावेश होतो. या चारही तालुक्यांमध्ये यंदा सरासरीएवढ्या रब्बीच्या पेरण्या झालेल्या नाहीत. ढगाळ हवामान, थंडीचा अभाव, पाण्याची कमतरता यांमुळे गव्हाचे क्षेत्र तुरळक प्रमाणातच दिसत असल्याचे चित्र आहे. बारामती तालुक्यात गव्हाच्या केवळ ४ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. त्याखालोखाल इंदापूरमध्ये ३ टक्के, दौंडमध्ये १ टक्का, तर पुरंदरमध्ये चक्क ‘०’ टक्का क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. भुसार मालाच्या बाजारपेठेत गव्हाचे स्थान महत्त्वाचे आहे. यंदाच्या भुसार बाजारपेठेवर याचा गंभीर परिणाम होणार आहे. मागणीपेक्षा स्थानिक बाजारपेठेतील गव्हाची उपलब्धता कमी राहणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे गव्हाचे बाजार यंदा चढे राहण्याची अधिक शक्यता आहे.बारामती तालुक्यात रब्बीतील ज्वारीच्या केवळ ६६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर, दौंड तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे ६ टक्के क्षेत्रावरच ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. खरिपापाठोपाठ पाण्याअभावी रब्बीही वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर, इंदापूर आणि पुरंदरमध्ये अनुक्रमे १२ व ७३ टक्के क्षेत्रावर ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. रब्बीमध्ये हमखास गव्हाचे पीक घेतले जाते.(वार्ताहर)