पुणे : ‘भारतीय सैन्याचे सदर्न कमांड शांतताकाळात आणि युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठीही सर्वतोपरी सज्ज आहे’, असे प्रतिपादन सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंग यांनी केले. भारतीय सैन्यातील कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी पुण्यातील नॅशनल वॉर मेमोरियलला भेट दिली. त्याप्रसंगी सिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.लेफ्टनंट कर्नल अशोक सिंग चार दशकांहून अधिक काळ भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अलीकडच्या काळामध्ये सैन्यातील अनेक अभियानांचे आणि सरावांचे यशस्वी नेतृत्व केले आहे. राजस्थानमधील ‘दृढ संकल्प’ आणि चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी यशस्वीपणे राबवलेले बचाव अभियान त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.अशोक सिंग यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत १९७१ मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश केला. त्यांचे वडील ‘सेव्हन गार्ड्स’चे पहिले कमांडिंग आॅफिसर होते. भारतातील वॉर मेमोरियल आणि वॉर म्युझियम उभारण्यात अशोक सिंग यांचा सिंहाचा वाटा आहे. (प्रतिनिधी)
सदर्न कमांड सज्ज
By admin | Updated: January 1, 2016 04:27 IST