शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक यंत्रणा तरीही तपास कुचकामी

By admin | Updated: May 7, 2017 03:01 IST

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळते, चोरी करणारे चोरटे त्यात दिसतात, गुन्ह्यातील फरार आरोपीचे मोबाईल जीपीएसच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळते, चोरी करणारे चोरटे त्यात दिसतात, गुन्ह्यातील फरार आरोपीचे मोबाईल जीपीएसच्या आधारे लोकेशन कळते, मोबाईल कॉल रेकॉर्ड मागविल्यावर गुन्ह्याबाबतचे आरोपीचे संभाषण काय झाले, कधी झाले, हे सर्व समजते. मात्र, आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही. पोलिसांकडे उपलब्ध असलेली अत्याधुनिक यंत्रणा गुन्ह्याच्या तपासकामी कुचकामी ठरू लागली आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे कुमार देवमहाराज आत्महत्या प्रकरण, त्या पाठोपाठ घडलेले तुकाराम चव्हाण आत्महत्या प्रकरण याचे पुढे काय झाले? हे प्रश्न नागरिकांच्या दृष्टीने अनुत्तरित आहेत. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी ही प्रकरणे काय आहेत, याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करता येईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले.चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र उर्फ कुमार देवमहाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेला दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. पोलिसांना मोाबईल कॉल रेकॉर्ड मिळाले होते. देवस्थानच्या विश्स्वतांपैकी आणि देव परिवारातील कोणी या घटनेचा पाठपुरावा केला नाही. म्हणून पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकला. परंतु, राज्यात प्रसिद्ध असलेल्या देवस्थानच्या विश्वस्ताने आत्महत्या का केली? हा प्रश्न नागरिकांना अद्यापही सतावत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे निवेदने, तक्रारी देऊन देवस्थानचे विश्वस्त स्वर्गीय देव यांना जेरीस आणले होते. त्यांच्या कारभाराची तसेच देवस्थानच्या जमिनीच्या खेरदी-विक्री व्यवहारासंबंधी वारंवार माहिती अधिकारात माहिती मागविली जात होती. त्यामुळे ते त्रस्त होते. धर्मादाय आयुक्तांकडे देवस्थानच्या व्यवहाराची माहिती मागविणाऱ्या तुकाराम चव्हाण या माहिती अधिकार कार्यकर्त्यानेही देव यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर लोणीकंद येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या दोन्ही घटनांचे एकमेकांशी काही ना काही संबंध असताना, पोलिसांनी सखोल चौकशीची तसदी घेतली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांची खंत : अपेक्षित वेळेत नाही तपासपोलीस खात्यात अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाली आहे. अनेक आयटी अभियंते पोलिसांना तपास कामात तांत्रिक मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल रेकॉर्डच्या आधारे तसेच अत्याधुनिक यंत्रणेचा अन्य पद्धतीने उपयोग करून पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. मात्र, पोलिसांकडून या यंत्रणेचा अवलंब करून नागरिकांना अपेक्षित असलेल्या वेळेत तपास होत नाही, अशी खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.