अवसरी बुद्रुक : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रतील ऊसउत्पादक शेतक:यांनी विभागीय पातळीवर किंवा त्यापुढील ऊस उत्पादनाचे पुरस्कार मिळविण्यासाठी आपले कसब दाखविले पाहिजे. ऊस उत्पादनवाढीसाठी मातीपरीक्षण हे प्रयोगशाळा निरगुडसर येथे लवकरच सुरू होणार आहे. नजीकच्या काळात दुसरा साखर कारखाना काढावयाचा आहे. त्यासाठी जी गावे सिंचनापासून वंचित आहेत तेथे पाणी उपलब्ध करून ऊसलागवड वाढविण्यासाठी प्रय} केले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव-दत्तात्रयनगर येथे गळीत हंगामात उसाची मोळी टाकून दिलीप वळसे-पाटील यांनी प्रारंभ केला. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, बांधकाम सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव मोरमारे, मथाजी पोखरकर, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिनभाऊ भोर, उद्योगपती किसनशेठ उंडे, पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, कारखान्याचे संचालक अॅड. प्रदीप वळसे-पाटील, उत्तम थोरात, बाळासाहेब खालकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगदीश हरळीकर यांच्यासह कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी मजूर उपस्थित होते. या वेळी शंकर महाराज शेवाळे, कर्डीले महाराज, अशोक महाराज काळे यांचीही भाषणो झाली. संत, महंत यांचा दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
4भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम आणि सर्व संचालक मंडळ, अधिकारी, ऊस उत्पादक शेतक:यांच्या कष्टामुळे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार मिळविला आहे. या शब्दांत अध्यक्ष देवदत्त निकम आणि त्यांच्या सहका:यांचा गौरव केला. कारखाना आणि परिसरातील विविध गावांतील विद्याथ्र्याच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. परंतु, त्यासाठी आवश्यक असणारी इमारत बांधकाम नजीकच्या काळात करावयाचे आहे. सद्य:स्थितीत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने यंदाचे ऊस गाळप आव्हानात्मक आहे. ऊस गाळप होणो कठीण असले, तरी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी यंत्रणा सज्ज आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.