शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी लवकरच जागा

By admin | Updated: June 15, 2016 05:26 IST

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘मास्टर प्लॅन’ ला एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता लवकरच विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी

पुणे : लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘मास्टर प्लॅन’ ला एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता लवकरच विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागा हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी पंधरा एकर जागा हस्तांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय सध्या असलेल्या रस्त्याला पर्यायी रस्ता आणि विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेला रस्ता, असे दोन रस्ते विकसित करण्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. तसेच, नागपूर चाळ ते विमानतळ दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरणही प्रस्तावित करण्यात आले आहे. ‘लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. विस्तारीकरणासाठी एअरपोर्ट अ‍ॅथोरिटीला पंधरा एकर जागा देण्याचे ठरले आहे. त्याशिवाय आणखी जागा लागत असल्यामुळे विमानतळाच्या सीमाभिंतीपासूनच्या शंभर मीटर परिसरात बांधकामांना परवानगी नाही. या जमिनी खासगी मालकीच्या आहेत. मोबदला देऊन, त्या ताब्यात घेण्याचा निर्णय मध्यंतरी घेण्यात आला. वाहतूकमंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही भेट देऊन या जागांची पाहणी केली होती. परंतु, त्यामध्येही अनेक अडचणी असल्यामुळे विस्तारीकरणाच्या कामात कोणतीही प्रगती झाली नव्हती. (प्रतिनिधी)विमानतळालगतची लष्कराची पंधरा एकर जागा एअरपोर्ट अ‍ॅथोरिटीकडे देण्याची योग्य ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शिवाय विमानतळ येथील वेकफिल्ड चौकालगत असलेली ‘आयओसी’ यांच्या मालकीची तीस एकर जागा आहे. एअरपोर्ट अ‍ॅथोरिटीने ती जागादेखील मागितली आहे. या जागेसह विमानतळाच्या शंभर मीटरच्या परिसरातील खासगी मालकीची जागा ताब्यात घेऊन, विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार एअरपोर्ट अ‍ॅथोरिटीची जागा, आयओसीच्या मालकीची आणि खासगी मालकीची जागा लक्षात घेऊन, विमानतळ विस्तारीकरणाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला होता. हा प्लॅन एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.