शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळ्या चोरणारी इराणी टोळी जाळ्यात

By admin | Updated: May 8, 2014 01:55 IST

शहरातील विविध भागांमधून गेल्या वर्षभरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लंपास करणार्‍या ५ जणांच्या इराणी टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पुणे : शहरातील विविध भागांमधून गेल्या वर्षभरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लंपास करणार्‍या ५ जणांच्या इराणी टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून शहरातील २२ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून, पोलिसांनी २१ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. मोहमद फिरोज खान ऊर्फ इराणी (वय १९, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), हैदरअली अब्बासअली सिया (वय २५, रा. सय्यदनगर, हडपसर), खमरअली फिरोजअली शेख (वय २०, रा. पापानगर, भुसावळ), रोशन अली जावेदअली शेख (वय १९, रा. शिवाजीनगर, परळी वैजनाथ), फिरोज खानू खान (वय ४२, रा. दत्तवाडी, कुसगाव मंदिरामागे, लोणावळा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने १२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीचे दागिने खरेदी करणारा सराफ सुनील वामन मानगावकर (वय ४५, रा. शाहुनगर, जयसिंगपूर, कोल्हापूर) यालाही अटक करण्यात आली आहे. इराणी टोळीचे गुन्हेगार चिंचवड येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. त्यानुसार त्यांना सापळा रचून पकडण्यात आले. त्या वेळी त्यांच्याकडून २ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. पोलीस कोठडीमध्ये असताना आरोपींकडे केलेल्या तपासात सोनसाखळीचोरीचे २२ गुन्हे उघडकीस आले. उघडकीस आणण्यात आलेले सर्व गुन्हे या वर्षीचे आहेत. (प्रतिनिधी)