शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सोनोग्राफीतज्ज्ञांचा पालिकेवर मोर्चा

By admin | Updated: December 8, 2015 00:13 IST

गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या जाचक व अतार्किक तरतुदींच्या विरोधात इंडियन रेडिओलॉजिकल व इमेजिंग असोसिएशनच्या (आयआरआयए) वतीने सोमवारी

पुणे : गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या जाचक व अतार्किक तरतुदींच्या विरोधात इंडियन रेडिओलॉजिकल व इमेजिंग असोसिएशनच्या (आयआरआयए) वतीने सोमवारी शहरात आयएमए ते महापालिका असा मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये शहर व जिल्ह्यातील साधारण १०० रेडिओलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट व अन्य तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वीरेन कुलकर्णी, सचिव डॉ. हिमानी तपस्वी, सह-सचिव डॉ. प्रशांत चौधरी व डॉ. मंगल महाजन, खजिनदार डॉ. राजलक्ष्मी देवकर, कार्यकारी व सल्लागार सदस्य डॉ. ए. बी. केळकर, डॉ. एम. आर. गुलाटी, डॉ. आदेश बुटाला, डॉ. विनय चौधरी, डॉ. गुरुराज लाच्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) डॉ. जयंत नवरंगे, अध्यक्ष डॉ. अविनाश भूतकर आदी या वेळी उपस्थित होते. आयएमएच्या कार्यालयापासून सुरु झालेला मोर्चा टिळक रोडमार्गे जंगली महाराज चौकातून काँग्रेस भवनमार्गे शिवाजीनगर येथील पुणे महानगरपालिकेच्या इमारतीपर्यंत आला. मुली वाचवा, प्रामाणिक डॉक्टरांना वाचवा, असे संदेश देणारे फलक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सोनोग्राफीतज्ज्ञांनी हातात घेतले होते.या आंदोलनाविषयी सांगताना डॉ. वीरेन कुलकर्णी म्हणाले, गर्भलिंग निदानाच्या आधारे स्त्रीभ्रूणहत्या करण्याच्या कृतीचा सर्व सोनोग्राफीतज्ज्ञ विरोध करतो. या बंदमुळे रुग्णांचे काही प्रमाणात हाल होणे शक्य असले तरीही हे आंदोलन रुग्णांच्या विरोधात नसून कायद्याच्या विरोधात आहे. गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. परंतु गंभीर गुन्हा आणि माहिती संकलनाच्या प्रक्रियेसारख्या कागदोपत्री किरकोळ त्रुटींसाठी एकच शिक्षा असू नये. काही जणांच्या चुकीची शिक्षा सर्वांना भोगावी लागणे हे चुकीचे आहे. त्यामुळे सरसकट सर्व डॉक्टरांना क्षुल्लक कागदोपत्री त्रुटींसाठी नाहक त्रास होऊ नये यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आंदोलनामुळे सोमवार व मंगळवार शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमधील एक्स-रे व सोनोग्राफी बंद राहणार असून असोसिएशनच्या या आंदोलनात बुधवारी राज्यातील सर्व सभासद सहभागी होणार आहेत.(प्रतिनिधी)कागदोपत्री किरकोळ चुका झाल्यास त्यासाठी कायद्यात दंडात्मक तरतूद करावी, मात्र प्रामाणिक सोनोग्राफीतज्ज्ञ, डॉक्टरांना वेठीस धरू नये. ज्या डॉक्टरांवर अशा किरकोळ कारणांसाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत किंवा कायद्यात बदल होईपर्यंत या न्यायप्रविष्ठ प्रकरणांना स्थगिती द्यावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी महापालिकेच्या आयुक्तांची मंगळवारी (दि. ८) भेट घेण्यात येणार आहे- डॉ. वीरेन कुलकर्णी, आयआरआयए अध्यक्ष