शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गाणे हेच माझे जीवन : उषा मंगेशकर

By admin | Updated: December 31, 2014 00:25 IST

लतादीदी आणि आशाताई यांच्याकडून गाणे शिकत गेले. आज गाणे हेच माझे जीवन आहे. या जीवनगौरव पुरस्काराने गाण्यातील ऊर्मी वाढली आहे,’’ अशी भावना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.

पुणे : ‘‘लतादीदी आणि आशाताई यांच्याकडून गाणे शिकत गेले. आज गाणे हेच माझे जीवन आहे. या जीवनगौरव पुरस्काराने गाण्यातील ऊर्मी वाढली आहे,’’ अशी भावना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि विश्वशांती संगीत कला अकादमी, पुणेतर्फे राजबाग, लोणी-काळभोर येथे आयोजिलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विशेष जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या. विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते मंगेशकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी उद्योगपती डॉ. अविनाश राचमाले, गुरुवर्य श्रीकृष्ण कर्वे गुरुजी, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रामदास फुटाणे, प्रा. राहुल कराड, डॉ. संजय उपाध्ये, आदिनाथ मंगेशकर, सुचित्रा नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.उषा मंगेशकर म्हणाल्या, ‘‘आम्हा पाचही भावंडांना वडिलांकडून सूर, तर आईकडून चांगली शिकवण मिळाली. लतादीदीकडून मार्गदर्शन लाभले. तिच्याकडून सुरातला चढऊतार शिकले. लतादीदी व आशाताई दोघी आपापले स्थान बनवत होत्या. त्यांच्याकडे बघून मी शिकत गेले. गाणे हे आपले जीवन आहे, असे वाटत होते. लतादीदींच्या गाण्यात एक प्रकारचा अलौकिक मिलाफ आहे. त्यामुळे आजच्या पिढीने तिच्या गाणाचा अभ्यास करावा.’’डॉ. शंकर अभ्यंकर म्हणाले, ‘‘धर्मसंस्कृतीचे वर्णन भारतीय संगीत असे आहे. भारतीय संगीत आणि मंगेशकर कुटुंबीय यांचा अनोखा मिलाफ आहे.’’ प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)