येरवडा : लोहगावमधील दादाची वस्ती येथे मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत असलेल्या महिलेच्या गळ्यातील १० तोळ्यांचे मंगळ्सूत्र चोरट्याने हिसकावले. दुचाकीवरून पळालेल्या चोरट्याला पोलिसांनी त्याच दिवशी नागरिकांच्या मदतीने अटक केली. त्याच्याकडून अशाप्रकारे ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. मागील २ वर्षांपासून तो अशाप्रकारे चोऱ्या करीत होता. विमानतळ पोलिसांनी आरोपीकडून ४ लाख ६४ हजार रुपये किंमतीचे सुमारे २३७ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले.राहुल पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच लोहगाव परिसरात नोव्हेंबर २०१३ पासून १५ जानेवारी २०१५ पर्यंत ८ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. गुरुवारी (दि. १५) सारिका सचिन खांदवे (वय ३३, रा. दादाची वस्ती, लोहगाव) या गणपती मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. घराकडे येत असताना दुचाकीवरून आलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता, संतनगरमधील तरुण असल्याचे निष्पन्न झाले. यावरून राहुल पवारला ताब्यात घेतले. सुरुवातीला राहुल उडवाउडवीची उत्तरे देत होता.४पोलिसांनी राहुलकडे सखोल चौकशी केली असता, त्याने ८ नोव्हेंबर २०१३ पासून १५ जानेवारी २०१५ पर्यंत ८ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून २३७ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले. राहुलने चोरलेला काही मुद्देमाल स्थानिक सराफांना विकला असल्याचे सांगितले. त्याने पहिली चोरी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली होती. त्यानंतर त्याने परिसरातील महिलांच्या सोनसाखळ्या चोरीचे प्रकार सुरू ठेवले. राहुलने सहायक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीचेही मंगळसूत्र चोरले होते.
सोनसाखळी चोरास अटक
By admin | Updated: January 20, 2015 00:53 IST