शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी नगराध्यक्षपदी सोनाली मोरे निश्चित

By admin | Updated: December 4, 2015 02:40 IST

तीर्थक्षेत्र जेजुरीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सोनाली मोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित असून, केवळ औपचारिकताच बाकी आहे.

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सोनाली मोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित असून, केवळ औपचारिकताच बाकी आहे.जेजुरी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून, पार्टीचे १७ पैकी १२ नगरसेवक आहेत. पहिली अडीच वर्षे अनुसूचित जातीसाठी राखीव होते. त्यानंतरची अडीच वर्षे महिला राखीव असल्याने पक्ष नेतृत्वाने पालिकेतील सर्वच महिला नगरसेविकांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याने हे पद सहा सहा महिन्यांसाठी ठेवण्यात आलेली आहे. त्यानुसार विद्यमान नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई यांची मुदत संपल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत समीर शिंगटे यांच्या पीठासीन अध्यक्षतेखाली सुरू असून, आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. नगरसेविका सोनाली मोरे यांनी पक्षनेते दिलीप बारभाई, नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई, उपनगराध्यक्ष लालासाहेब जगताप, नगरसेवक सुधीर गोडसे, गणेश आगलावे, अविनाश भालेराव, नगरसेविका साधना दीडभाई, संगीता जोशी, सुरेखा सोनवणे, साधना दरेकर, रवी जोशी, दिलीप मोरे, विठ्ठल सोनवणे आदींच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी तो स्वीकारला. येत्या ८ तारखेला निवडणूक होत असून, केवळ निवडणुकीची औपचारिकता व अधिकृत घोषणाच होणे बाकी आहे. (वार्ताहर)