शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कही खुशी कही गम...शिरूर तुपाशी, खेड उपाशी

By admin | Updated: May 10, 2017 03:57 IST

चासकमान धरणातून शिरूर तालुक्यासाठी २० दिवसांकरिता डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी ३६ दिवस उलटूनही ते अजूनही सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदावडी : चासकमान धरणातून शिरूर तालुक्यासाठी २० दिवसांकरिता डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी ३६ दिवस उलटूनही ते अजूनही सुरू आहे. खेड तालुक्याला धरणातील पाणी संपल्यानंतर, पाणी मिळणार का, असा सवाल शेतकरी विचारत आहे. या धरणासाठी आमच्या जमिनी गेल्या, मात्र शिरूर तालुका तुपाशी, खेड तालुका उपाशी असे चित्र दिसत आहे. हे आवर्तन अजून किती दिवस चालणार आहे, या धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे का नाही,असे शेतकरी प्रश्न विचारू लागला आहे.चासकमान धरणातून (दि.३) डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स वेगाने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. १४४ किलोमीटर डावा कालवा लांबीचा आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या आवर्तनामध्ये ५ दिवस पाणी वहनासाठी २० दिवस शिरूरसाठी व २०दिवस खेड तालुक्यासाठी असे नियोजन या आवर्तनाचे करण्यात आले होते; मात्र आता ३६ दिवस उलटूनही अजून खेड तालुक्यतील शेतकऱ्यांसाठी पाणी खुले केले नाही, पाणीचोरी होऊ नये म्हणून खेड तालुक्यातील कडधे, कान्हेवाडी, कमान,चास, आखरवाडी, बुट्टेवाडी, पांगरी, काळेचीवाडी, तिन्हेवाडी सातकरस्थळ , भांबुरवाडी, टाकळकरवाडी, मांडवळा रेटवडी,निमगाव, दावडी, चिचोंशी येथे असलेल्या डाव्या कालव्याच्या मोऱ्या-चाऱ्या वर मुरुम टाकून बंद केल्या आहे. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी कालव्यातून वाहणारेपाणी शेतीसाठी घेऊ नये, यासाठी पोलिसाचे भरारी पथक ठेवण्यात आले आहे.कालव्याच्या रस्त्याने दिवस-रात्र पोलीस कडधेपासून ते दावडीपर्यंत लक्ष ठेवून आहे. तसेच, डाव्या कालव्यावर असणाऱ्या कृषिपंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी चासकमान धरणाच्या पाण्याच्या भरवशावर घेतलेली उन्हाळी पिके जळून गेली आहेत. चासकमान धरणामध्ये १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात मे महिन्याचे २२ दिवस शिल्लक आहे. विचार केला असता पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करणे गरजेचे असताना आता हे ४५ दिवसांचे आवर्तन हे शिरूर तालुक्यासाठीच होणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खेड तालुक्यासाठी किती दिवस पाणी मिळणार, अशा चिंतेते शेतकरी आहेत, पाटबंधारे अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.