शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध जीवन कंपनीची आणखी काही मालमत्ता सीआयडीच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात समृद्ध जीवन फूड्स आणि समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्ट पर्पज कपंनीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात समृद्ध जीवन फूड्स आणि समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्ट पर्पज कपंनीवर देशभरात अनेक गुन्हे दाखल असून त्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) करीत आहेत. सीआयडीच्या तपास पथकाला नर्‍हे आंबेगाव येथील २ फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे सापडली असून त्यातून कंपनीची आणखी काही मालमत्ता समोर आली आहे. गुरुवारी सकाळपासून सीआयडीचे १२ जणांचे पथक ही कागदपत्रे छाननी करण्याचे काम करीत असून ते उद्याही सुरु राहणार आहे.

सीआयडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध जीवनचा तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यात एकूण २५ आरोपी असून त्यापैकी सीआयडीने महेश मोतेवार याच्यासह १७ जणांना अटक केली आहे.

समृद्ध जीवनची काही कागदपत्रे हलविली जात असल्याची माहिती सीआयडीच्या या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर पाळत ठेवून ते कोठे जात आहेत, त्यांचा पाठलाग केले. नर्‍हे आंबेगाव येथील एका इमारतीत ते गेले. या इमारतीतील दोन फ्लॅटमध्ये ही कागदपत्रे ठेवण्यात आली होती. तसेच एका दुकानातही काही कागदपत्रे ठेवली असल्याचे आढळून आले.

मनिषा पाटील, ३ पोलीस निरीक्षकांसह १२ जणांचे पथक आज दिवसभर या कागदपत्रांची पडताळणी करीत होते. या कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने समृद्ध जीवन ने देशभरात कोठे कोठे मालमत्ता खरेदी केली. कोठे जमीन आहे याची ही कागदपत्रे आहेत.

महेश मोतेदार यांनी समृद्ध जीवनमार्फत गुंतवणूकदारांची आतापर्यंत साडेतीन हजार कोटीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी त्याच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांमधून समृद्ध जीवनची आतापर्यंत ज्ञात नसलेली मालमत्ता समोर आली आहे. ती जप्त करण्यासाठी ही कागदपत्रे सीआयडीला उपयुक्त ठरणार आहे.