शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

काहींची दिवाळी, तर काहींचे दिवाळे

By admin | Updated: October 21, 2014 05:12 IST

नातेवाईक - मित्रपरिवाराकडून उसनवारीपासून ते मालमत्ता विकण्यापर्यंत आणि दागिने गहाण ठेवण्यापर्यंतच्या निवडणुकीतील सुरस कहाण्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे

पुणे : नातेवाईक - मित्रपरिवाराकडून उसनवारीपासून ते मालमत्ता विकण्यापर्यंत आणि दागिने गहाण ठेवण्यापर्यंतच्या निवडणुकीतील सुरस कहाण्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च झाला. चौरंगी - पंचरंगी लढतीत काहींची लॉटरी लागली, त्यांची दिवाळी साजरी होतेय, मात्र पराभव झालेल्यांचे दिवाळे वाजले आहे. दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुका या राजकीय नेत्यांच्या दृष्टीने एक युद्धच असते़ ते सर्व शक्तीनुसार लढविताना केवळ विजय मिळवायचा या एकमेव ध्येयाने प्रत्येकजण साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा अवलंब करीत असतो़ त्यात अनेकदा त्यांना स्वकियांकडूनच अडथळे येतात़ यंदाच्या निवडणुकीतही हे दिसून आले. त्यामुळे अनेक उमेदवारांकडून झालेला खर्च आणि प्रत्यक्षात मिळालेली मते यांचे गणित कोठेच जुळत नसल्याचे दिसत असल्याने मनस्तापाची वेळ आली आहे. आघाडी आणि युतीमुळे अनेक मतदारसंघातील आमदारकीच्या इच्छुकांना आपल्या आकांक्षांना मुरड घालावी लागत होती. क्षमता असूनही आघाडीच्या राजकारणात लढण्याची संधी मिळत नव्हती. पण, निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाच आघाडी आणि युती तुटली़ त्यामुळे या इच्छुकांना पर्याय मिळाला. आमदारकीचे स्वप्न समोर दिसू लागल्याने अनेकांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला़ जवळ आलेली दिवाळी लक्षात घेऊन पणत्या, सुवासिक साबण, उटणे अशा वस्तू मतदारांना पुरविल्या़ कार्यकर्त्यांना जपताना अनेकांनी चांदीच्या भेटवस्तूही दिल्या़ काहींनी ब्रेसलेटही पुरविली़ प्रचारात त्यांना कोठेही कमी पडू नये, म्हणून त्यांची बडदास्त ठेवली़ कार्यकर्त्यांच्या मागण्याही वाढत होत्या. दररोजचा भत्ता वाढवून देण्याची मागणी होत होती. संपूर्ण प्रचारात एका उमेदवाराचा प्रचार करत असताना मतदानाच्या दिवशी मतदान प्रतिनिधी म्हणून दुसरा उमेदवार अधिक पैसे देत असल्याचे पाहून त्याचे काम करण्यासही पुढे - मागे पाहिले नाही़ (प्रतिनिधी)