पुणे : कर्वेनगर भाग कचरामुक्त करण्यासाठी कंटेनर गायब करण्यात आले आहेत. त्याचवेळी नागरिकांना कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकदा रात्रीच्या वेळेत कचरा रस्त्याच्या बाजुला व उघड्यावर टाकला जात असून, दुर्गंधी व रोगराई पसरण्याची भिती आहे. पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करून कचरा कोंडी सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी मंगळवारी केली. प्रभाग क्रमांक ३२ मध्ये ‘लोकमत आपल्या दारी’चा कार्यक्रम मंगळवारी झाला. स्थानिक नगरसेविका सुरेखा मकवान, शिक्षण मंडळ सदस्या मंजुश्री खर्डेकर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक एस. एम. सावंत, गणपत पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक महेशकुमार सरपाते, उपअभियंता दिलीप पावरा, विभागीय आरोग्य निरीक्षक श्रीनिवास, आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान, पीएमपीचे संजय बांदल आदी उपस्थित होते. ‘लोकमत’च्या व्यासपीठावर नागरिकांनी कचरा, रस्ते, पदपथ, वाहतूक व विकास आराखड्यातील प्रस्तावित बदलाविषयीच्या समस्या मांडल्या. नगरसेविका व अधिकाऱ्यांनी समस्यांवर कार्यवाहीचे आश्वासन दिले.अभ्यासाठी प्रस्ताव पुढे ढकलला याबाबत कदम म्हणाले, आंबिल ओढयात पद्मावती मंदीराच्या परिसरात धनकवडी, तळजाई तसेच बिबबेवाडीचे पाणी एकत्र येते. त्यामुळे फुलपाखरू उद्यानापासून पुढे हा ओढा प्रभागातून पुढे जाताना, मोठया प्रमाणात पाण्याची दूर्गंधी पसरते. त्यावर तोडगा काढण्यासाठी आपण स्वत: प्रशासनास वारंवार पत्रव्यवहार केला. तसेच नाला सुधारणा योजने अंतर्गत तब्बल ८० लाख रूपयांची तरतूदही उपलब्ध करून दिली. मात्र, प्रशासनाकडून अद्याप काहीच हालचाल झालेली नाही. या प्रकल्पास आपला विरोध नाही. मात्र, या प्रकल्पाने काही मोजक्याच नागरिकांची समस्या सुटेल मुळ समस्या तशीच राहिल. त्यामुळे प्रायोगिक तत्वावरील या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक असल्याने तो पुढे ढकलण्यात आला आहे.प्रभागामध्ये कचऱ्याची समस्या गंभीर आहे. मात्र, नागरिकांनी केवळ समस्या मांडून न थांबता त्यावर आवश्यक उपायोजना करण्यासाठी पुढाकार घेवून सहकार्य करावे. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. रस्त्यावरील गतीरोधक यापुढे उच्च न्यायालयाच्या निकषानुसार बसविण्यात येणार आहेत.- सुरेखा मकवान, नगरसेविका‘‘पुण्यात शिक्षणासाठी बाहेरुन येणाऱ्या विद्यार्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशा मुलांना भाड्याने घर देताना त्यांची सर्व माहिती घर मालकाने पोलिसांना कळविणे आवश्यक आहे. घरमालकांनी माहिती न दिल्यास त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. ’’- अरविंद पाटील, सहायक पोलीस आयुक्तप्रभागातील नोकरी करणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी कचऱ्याची घंटागाडी सायंकाळी ७ ते १० वेळेत फिरविली जाते. कचरा गोळा करण्याऱ्या स्वयंसेवकांना महापालिका वेतन देत नाही. नागरिकांकडून मिळणाऱ्या पैशांवरच त्यांची उपजिविका चालते. त्यामुळे कचरा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.- पी. पी. श्रीश्रीमाळ, विभागीय आरोग्य निरीक्षकपोलिसांच्या संख्येच्या तुलनेत हातगाडींचे प्रमाण दहापट आहे. त्यामुळे पोलीस अतिक्रमणांवर कारवाई करू शकणार नाहीत. त्यासाठी महापालिकेचा स्वतंत्र अतिक्रमण विभाग आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाते. एखादा रिक्षावाला भाडे नाकारत असल्यास तातडीने वाहतूक पोलिसांनी कळवावे.- एस. एम. सावंत, वाहतूक पोलीस निरिक्षक
कर्वेनगरमधील कचराकोंडी सोडवा
By admin | Updated: March 25, 2015 00:19 IST