शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

हवेली तालुक्यातील कुष्ठरोग बांधवांचे प्रश्न मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हवेली तालुक्यातील अंतुलेनगर पिसोळी येथील कुष्ठरोग बांधवांच्या वसाहतीच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्याचे विधान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : हवेली तालुक्यातील अंतुलेनगर पिसोळी येथील कुष्ठरोग बांधवांच्या वसाहतीच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कुष्ठरोग बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

वसाहतीमध्ये तेथील नागरिकांचे वास्तव्य पन्नास वर्षांपासूनचे आहे. त्या शेजारीच त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी डॉक्टर बंडोरवाला लेप्रसी हॉस्पिटल अस्तित्वात आहे. त्यामुळे त्यांना सदर ठिकाणी उपचार घेऊन राहणे व काम करणे सोयीचे आहे. एकाच ठिकाणी राहणे, उपचार व रोजगार असल्यामुळे त्यांना उपजीविका करणे सोयीस्कर झाले आहे. साधारणत: पन्नास वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री अंतुलेसाहेब यांनी वन खात्यामार्फत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आले असता कुष्ठरोग बांधवांना या ठिकाणी राहण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार ते सदर ठिकाणी राहत असून घराचा टॅक्स, लाईटबिल नियमितपणे भरत आहेत. परंतु येथील नागरिकांना वन विभागामार्फत घरे रिकामी करावयाची नोटीस देण्यात आली आहे. सदर बाबतीत लक्ष घालून सदर कार्यवाही थांबवावी अशी मागणी केली. पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालींदर कामठे यांनी हे निवेदन दिले. एकाही घराला धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन प्रवीण दरेकर यांनी अंतुलेनगर येथील उपस्थित नागरिकांना दिले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पन्नालाल निकम, नरेंद्र मरळ व अंतुलेनगर भागातील नागरिक उपस्थित होते.