शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कामगार नेत्याला विकले पिस्तुल

By admin | Updated: December 22, 2014 23:34 IST

अकलुजच्या कंत्राटदारावर बारामतीत दरोडा टाकलेल्या आरोपींना गुन्हेशोध पथकाने अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता

बारामती : अकलुजच्या कंत्राटदारावर बारामतीत दरोडा टाकलेल्या आरोपींना गुन्हेशोध पथकाने अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, या आरोपींनी गावठी पिस्तुल, गोळ्या माथाडी कामगारांच्या अध्यक्षाला विकल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी माथाडी कामगार अध्यक्ष सचिन मायचंद पवार (वय ३१, रा. कन्हेरी ) यास देखील अटक केली आहे. दि. १५ डिसेंबर रोजी दरोडा टाकण्यात आला होता. या गुन्ह्यात अंबादास तायप्पा पवार, त्याचा साथीदार आकाश ऊर्फ अक्षय बापू जाधव, सनी नंदकुमार शिंदे, अमित कल्याण खाडे यांना अटक केली. बारामती शहर व विशेष पोलीस पथकाने त्याचा संयुक्त तपास केला होता. यावेळी अंबादास पवार याने सचिन मायचंद पवार याला गावठी पिस्तुल, ५ गोळ्या जवळपास १ लाख रुपये किमतीला विकला होता. सचिन पवार याच्याकडून पिस्तुल, गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. अंबादाससह त्याच्यावर बेकायदेशीर हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना दि. २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.अंबादास पवार आणि त्याच्या साथीदाराने एीमआयडीसी परिसरात अनेक गुन्हे केले आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील त्यांनी गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, डीवायएसपी संभाजी कदम, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी या गुन्ह्या प्रकरणी विशेष लक्ष दिले होते. पोलीस फौजदार गोरख संकपाळ, अण्णा जाधव, हवालदार शिवाजी निकम, अशोक पाटील, अनिल काळे, रविराज कोकरे, संदीप मोकाशी, संदीप कारंडे, मारुती हिरवे, दिलीप सोनवणे, सुधीर काळे, ज्ञानदेव साळुंके, सदाशिव बंडगर या पथकाने या सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)