शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हवेलीच्या सभापतिपदी शीतल गारूडकर बिनविरोध

By admin | Updated: April 8, 2016 01:00 IST

आज-उद्या करता-करता अखेर हवेली पंचायत समितीचे सभापतिपदही बदलले असून, गुरुवारी पाडव्याच्या पूर्वसंध्येला मांजरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल गारूडकर यांची बिनविरोध निवड झाली.

पुणे : आज-उद्या करता-करता अखेर हवेली पंचायत समितीचे सभापतिपदही बदलले असून, गुरुवारी पाडव्याच्या पूर्वसंध्येला मांजरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल गारूडकर यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतींना गेल्या वेळी पक्षनेते अजित पवार यांनी निवड करताना सव्वा वर्षासाठी ही निवड केल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गेल्या ४ महिन्यांपासून काही पंचायत समित्यांत हे बदल करण्यात आले. यात मुळशी, पुरंदरमध्ये सभापती-उपसभापतींचा बदल केला होता. हवेलीच्या सभापती व उपसभापतींचाही राजीनामा पक्षनेत्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्याकडे आला होता. मात्र, यापैकी फक्त उपसभापतींचा राजीनाम मंजूर झाल्याने यापूर्वी उपसभापतिपदासाठी निवडणूक लागली होती. यात निवडणूक होऊन ६ मतांची आघाडी घेऊन राष्ट्रवादीचे नितीन दांगट यांची उपसभापतिपदी निवड झाली होती.उपसभापतिपदाचा राजीनामा मंजूर केला; मात्र सभापतिपदाचा राजीनामा मंजूर केला नव्हता. यामुळे सभापतींना अभय मिळाले, अशी चर्चा होती. आता निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्याने नवीन सभापती झाले, तर त्यांना आठ ते नऊच महिने मिळणार. त्यामुळे बदल होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी सभापतींचाही राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पक्षनेत्यांच्या आदेशानुसार मंजूर केला आणि ९ दिवसांपूर्वी सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम लागला होता.