शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला हवे उद्बोधक साहित्य : प्रतिभाताई पाटील; पुण्यात अ‍ॅड. रावसाहेब शिंदे पुरस्कार वितरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 13:24 IST

उद्बोधक साहित्याची आणि हिऱ्यासारख्या साहित्यिकांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.

ठळक मुद्देज्यांच्यासमोर नैवेद्य ठेवावा आणि ज्यांचा प्रसाद घ्यावा, असे देव आता उरलेले नाहीत : कर्णिक मागच्या पिढीने दिलेले देणे या पिढीने जपून ठेवले पाहिजे : कदम

पुणे : नवसमाजरचनेमध्ये अक्षर साहित्य समाजोपयोगी असण्याची गरज आहे. शरीराला ज्याप्रमाणे भरणपोषणाची आवश्यकता असते, त्याप्रमाणे मनाच्या उद्बोधनासाठी साहित्य, विचार, चिंतनाची गरज असते. जे लेखन वाचकांना अस्वस्थ करते, आत्मपरीक्षण करायला लावत नव्या जाणिवांचे दालन खुले करते, जुन्या मूल्यांची नव्याने जाणीव करून देते, अशा उद्बोधक साहित्याची आणि हिऱ्यासारख्या साहित्यिकांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांचा स्मृतिदिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कमलकिशोर कदम यांना गौरविण्यात आले. उद्योजक विक्रम उरमोडे, कवयित्री सुप्रिया वाईकर, रवींद्र डोमळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य होते. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, शशिकला रावसाहेब शिंदे उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, ‘ऋषी, साधू होण्यासाठी हातात कमंडलू घेऊन, विशिष्ट रंगाचे कपडे घालून हिमालयात जायला पाहिजे, असे नाही. राजकारण, समाजकारणात उत्तम काम करूनही ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आकाराला येते. रावसाहेबांना भेटल्यावर माहेरच्या माणसाला भेटल्यासारखा आनंद व्हायचा. 

ज्यांच्यासमोरनैवेद्य ठेवावा आणि ज्यांचा प्रसाद घ्यावा, असे देव आता उरलेले नाहीत. रावसाहेब शिंदे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या नावाचा पुरस्कार म्हणजे प्रसाद आहे. समाजाची सात्त्विकता, सुसंस्कृतता आणि सामाजिकता जपणारी आमची बहुधा शेवटची पिढी आहे. - मधू मंगेश कर्णिक

कदम म्हणाले, ‘शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या माणसांनी या शहराचा समृद्ध इतिहास घडवला. मागच्या पिढीने दिलेले देणे या पिढीने जपून ठेवले पाहिजे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावे. त्यातूनच महाराष्ट्राचे उजवल भवितव्य घडेल.’

भावे म्हणाले, ‘निवडणुकीत ८० टक्के मतदान गरीब तर २० टक्के मतदान श्रीमंत करतात. मात्र, निवडणुकीनंतर २० टक्के श्रीमंत लोकांनाच लाभ मिळतो. सध्या पद्मावती हा प्रश्न नाही, तर रोजगार हा खरा प्रश्न आहे.’

वैद्य म्हणाले, ‘रावसाहेब शिंदे यांचे जीवन म्हणजे ध्यासपर्व आहे. प्रत्येक कामामध्ये त्यांनी सर्वस्व अर्पण केले. आपल्या देशातील माणसे अशी सुसंस्कृत झाली तर आपला देश जगातील संस्कृतीच्या शिखरावर जाऊन बसेल.’

उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलBhai Vaidyaभाई वैद्य