शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातून सामाजिक एकता पेरावी

By admin | Updated: April 27, 2017 05:21 IST

देशभरात असहिष्णुता वाढत असून, अतिरेकी धर्मांधता फोफावत आहे. अशा द्वेषाच्या पायावर देश महासत्ता कदापि होऊ शकणार नाही.

पुणे : देशभरात असहिष्णुता वाढत असून, अतिरेकी धर्मांधता फोफावत आहे. अशा द्वेषाच्या पायावर देश महासत्ता कदापि होऊ शकणार नाही. याविरोधात लढण्याची वेळ आली असून, विद्यापीठांतून सामाजिक एकतेची बीजे पेरली जावीत, असे मत ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.कात्रज येथील भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या २२ व्या स्थापना दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, प्रसिद्ध विनोदी साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, फिजिशियन आणि समाजसेवक डॉ. विनोद शहा, माजी कुलगुरु डॉ. एस. एफ. पाटील यांना भारती विद्यापीठ विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह विश्वजित कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, माजी कुलगुरू उत्तमराव भोईटे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते. काळे म्हणाले, ‘‘भौतिक ज्ञानाच्या विकासावर देश महासत्ता होणार नाही, त्याला सांस्कृतिक संचिताचीही जोड देणे गरजेचे आहे. खरे तर सामाजिक हेतू नसणारे ज्ञान हे व्यर्थच असते. आज त्या ज्ञानात जातीयतेचे हिरवे, भगवे आणि निळे रंग मिसळले जात आहेत. आपल्या धर्माच्या अतिरेकी प्रेमावर आणि इतर धर्माच्या अविवेकी द्वेषावर या देशाच्या महासत्तेची इमारत उभी राहू शकणार नाही. देशात असहिष्णुता वाढत असून, सत्तेसाठी धर्माचे राजकारण केले जात आहे. त्याविरोधात लढण्याची वेळ आली आहे.’’